Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘गाव चलो अभियान'ची दणक्यात सुरुवात! बाबूश यांनी दिले आगामी महापालिका अन् विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे संकेत

Babush Monserrate Launches ‘Gaon Chalo’ Abhiyan in Panaji: भाजपच्या स्थापना दिनाच्या पक्ष कार्यालयात अनुपस्थित राहिलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी स्थापना दिनाचा भाग म्हणून ‘गाव चलो अभियान’ राबविण्यास सुरुवात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भाजपच्या स्थापना दिनाच्या पक्ष कार्यालयात अनुपस्थित राहिलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी स्थापना दिनाचा भाग म्हणून ‘गाव चलो अभियान’ राबविण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी शहरातील भाजपच्या एकगठ्ठा मते असणारा बोक दी व्हॉक आणि मळा परिसरात कार्यक्रम पक्षाचा झेंडा घेऊन फेरी काढणे आदींमधून आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीचीच तयारी सुरू केल्याचे दिसून येते.

भाजपचा (BJP) ४६ वा स्थापना दिवस समारंभ पक्षाच्या मुख्य कार्यालयात झाला. यावेळी तिसवाडीतील भाजपचे तीन आमदार उपस्थित होते. पण पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात अनुपस्थित होते, ही बाब प्रकर्षाने जाणवली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ते राज्याबाहेर असल्याचे माध्यमांना सांगितले, पण काहीच वेळात बाबूश यांनी मिरामार येथील पक्ष कार्यालयाबाहेर स्थापना दिनाची मिठाई खाल्ली. त्यामुळे उलट सुलट चर्चा झाली.

मात्र, अखेर गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात उत्तर गोवा कार्यकर्ता मेळाव्यात ते उपस्थित होते आणि त्यांनी घोषणाही दिल्या. तसेच बोक दी व्हॉक येथे ‘गाव चलो अभियान’चा भाग म्हणून कारसेवकांचा सत्कार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक (Damu Naik), माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उपस्थिती होती. १३ रोजी त्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादनही केले.

बाबूश यांचा सध्या ‘पॅचवर्क’वर भर

कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर मंत्री बाबूश यांनी आल्तिनो ते मळ्यात फेरी काढली. हातात पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांच्या भेटीगाठी केल्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांनी एकप्रकारे हवा भरली आहे. २०२६ मध्ये महानगरपालिका निवडणुका होणार आहेत, त्यात शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांवर नागरिक नाराज आहेत, ते मतदानाच्या रुपातून आपला राग काढू शकतात. त्यामुळे बाबूश यांनी सध्या पॅचवर्क करण्यावर भर दिल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT