Babush Monserrate in Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1 लाख 17 हजार जण बेरोजगार

बाबूश मोन्सेरात यांची माहिती; रोजगार विनिमय केंद्र ऑनलाईन नोंदणीत उघड

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात नवे उद्योग गुंतवणूक करत नसल्याने संख्या वाढत आहे. रोजगार विनिमय केंद्र ऑनलाईन सुरू झाल्यापासून गेल्या तीन वर्षात 1 लाख 34 लाख हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. पण त्यापैकी 1.17 लाख जण बेरोजगार आहेत. कंपन्यांतील रिक्त पदांवर रोजगार विनिमय केंद्रातील नोंदणी असलेल्या उमेदवारांची नेमणूक करण्याची सक्ती नसल्याने या कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माहिती दिली. गेल्या तीन वर्षांत रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी झालेल्या उमेदवारांपैकी 1879 जणांना सरकारी खात्यामध्ये तर 15,852 जणांना खासगी कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे.

याव्यतिरिक्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी नसलेल्यांनाही खासगी कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विधानसभेत अतारांकित प्रश्‍नाला देण्यात आलेल्या उत्तरात बेरोजगाराची माहिती ही उमेदवार वा अर्जदाराने ऑनलाईनवेळी नोंदणी केलेल्याच्या माहितीवर देण्यात आली असल्याचे विधानसभेत स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन वर्षांत 9488 जणांना रोजगार

रोजगार विनियम केंद्रात ऑनलाईनद्वारे उमेदवारांना नावनोंदणी करता येते. त्या संकेतस्थळांवर रिक्त असलेल्या पदांची माहितीही मिळते. त्यानूसार शैक्षणिक पात्रतेनुसारही केंद्रातून संबंधित आस्थापनांना नावे पाठवण्यात येतात. या केंद्राकडे सुमारे 265 कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्याद्वारे आतापर्यंत तीन वर्षांत 9488 जणांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती विधानसभेतील अतारांकित प्रश्‍नावरील उत्तराला देण्यात आली.

अधिकृत बेरोजगारीचे प्रमाण ठरवणे कठीण

खासगी कंपन्यांत 25 किंवा त्यापेक्षा अधिक रिक्त जागा भरावयाच्या असल्यास त्या अधिसूचित करण्याचा प्रस्ताव रोजगार विनिमय सक्ती अधिसूनेच्या रिक्त कायद्याखाली नाही. नावनोंदणी केल्यास तो उमेदवार अजूनही बेरोजगार आहे असे गृहित धरता येत नाही. अनेकदा त्याला रोजगार मिळालेला असतो. त्यामुळे अधिकृत राज्यात बेरोजगारीचे किती प्रमाण ठरवणे कठीण आहे असे उत्तर देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Post Office Scheme: सुरक्षित पैसा, जबरदस्त परतावा! पोस्टाची 'ही' योजना तुम्हाला बनवते 'लखपती'; बिना रिस्क 15 लाखाहून अधिक मिळवण्याची संधी

Panjim Protest: 'नेपाळी गोव्यात येऊन धंदा करतोय...', आंदोलकांनी Swiggyच्या 'डिलिव्हरी बॉय'ला घेरत सरकारवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT