Babu Kavlekar
Babu Kavlekar Dainik Gomantak
गोवा

Goa News: सेपेकटॅकरो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बाबू कवळेकर यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक

मडगाव: सेपेकटॅकरो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची बिनविरोध निवड झाली. कोलकाता येथे झालेल्या बैठकीवेळी ही निवड करण्यात आली. कवळेकर हे संलग दुसऱ्यांदा या फेडरेशनचे राष्ट्रीय स्तरावरील अध्यक्ष झाले आहेत. याबाबत कवळेकर यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

(Babu Kawlekar elected unopposed as president of Sepektakaro Federation of India)

1998 साली सर्वप्रथम सेपेकटॅकरो या खेळात प्रसार करण्याच्या कामात कवळेकर यांनी भाग घेतला. तेंव्हापासून सातत्याने कवळेकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. अनेक गोमंतकीय खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहेत.

राष्ट्रीय व राज्य स्तरावर सिनियर, ज्युनिअर व सब- ज्युनिअर स्पर्धा आयोजित करीत असताना आज हा खेळ गोव्याबरोबर देशातील सर्व विद्यालयात पोचवण्यासा कवळेकर यशस्वी झाले आहेत. सपेकटॅकरो फेडरेशन ऑफ इंडिया ही मोठी प्रतिष्ठेची व महत्वाची राष्ट्रीय संस्था आहे. कवळेकर यांची निवड सपेकटॅकरो फेडरेशन ऑफ इंडियाच्या आमसभेत करण्यात आल्यानंतर कवळेकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT