Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

मडगावला गतवैभव मिळवून देण्यास आजगावकर यांचे प्राधान्य..

मडगावचे सध्याचे आमदार मुख्यमंत्री असतानासुद्धा मडगावचा विकास करू शकले नाहीत. विकास म्हणजे काय हे दाखविण्याची संधी नगरिकानी मला द्यावी

दैनिक गोमन्तक

सासष्टी: भारतीय जनता पक्षाने आपल्यावर मडगावची जबाबदारी सोपवली आहे व त्यासाठी आगामी निवडणुकीसाठी मडगावची उमेदवारी देऊ केली आहे. मडगावला गतवैभव मिळवून देण्यास माझे सदैव प्राधान्य राहील. मडगाव ही माझी जन्म व कर्म भूमी. मी इथेच लहानाचा मोठा झालो. तेव्हा मठग्रामस्थांनी मला परका मानू नये व गत 20 वर्षांत जी प्रगती झाली नाही ती करून दाखविण्यास आपल्याला पाठिंबा द्यावा. पक्षाच्या मडगावातील कार्यकर्त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री व मडगावचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी केले.

निवडणुकीच्या (Goa assembly) तयारीचा आढावा घेण्यासाठी मडगावात बीपीएस क्लबमध्ये भाजप मंडळाने कार्यककर्त्यांची बैठक बोलावली होती, तेव्हा आजगावकर बोलत होते. या बैठकीला मंडळाचे पदाधिकारी, महिला व युवा मोर्चाचे, बुथ प्रमुख उपस्थित होते. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

आपली राजकीय कारकीर्द मडगावमधूनच (Margao) सुरू झाली. नगरसेवक असताना माझ्या प्रभागमधील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी सदैव झटलो. मडगावचे सध्याचे आमदार मुख्यमंत्री असतानासुद्धा मडगावचा विकास करू शकले नाहीत. विकास म्हणजे काय हे दाखविण्याची संधी आपल्याला मडगावकरांनी द्यावी असेही आजगावकर यांनी सांगितले. आपण पेडणे व धारगळचा चांगल्यापैकी विकास केला आहे. मडगावबद्दल मला आस्था व अभिमान आहे, असेही आजगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT