Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

विश्वजीत राणे यांनी प्रचाराचा नारळ फोडला

विश्वजीत राणे (Vishwajit Rane) 2007 पासून आपल्या प्रचाराची सुरूवात करंझोळ येथील देवीला सांगणे करून करीत आलेले आहेत.
Published on

वाळपई: वाळपई मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. सत्तरी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान करंझोळ येथील श्री सातेरी ब्राह्मणी महामाया देवस्थानात जाऊन श्रीफळ अर्पण करून देवीला परंपरेनुसार सांगणे घातले आणि प्रचार सुरू केला. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Vishwajit Rane Latest News)

Vishwajit Rane
गोव्यात पूर्ण बहुमत न मिळाल्यास..: अरविंद केजरीवाल

विश्वजीत राणे (Vishwajit Rane) 2007 पासून आपल्या प्रचाराची सुरूवात करंझोळ येथील देवीला सांगणे करून करीत आलेले आहेत. ती परंपरा त्‍यांनी यावेळीही कायम ठेवली. राणे म्हणाले की, आपण गेल्या 15 वर्षांत केलेली विकासकामे घेऊन लोकांसमोर जाणार आहे. या काळात हजारो युवकांना रोजगार दिला. विविध सार्वजनिक कामे मार्गी लावीत ग्रामीण भागात सुविधा पोचविल्या. जलशुद्धीकरण प्रकल्प, हॉटमिक्स रस्ते, पूल आदी कामे केली आहेत. आपल्या विरोधात कोणीही निवडणूक (Election) लढवली तरी फरक पडत नाही.

Vishwajit Rane
GMC कोरोनाच्या विळख्यात; 200 हून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी बाधित

सत्तरीतील लोकांना मी केलेला विकास दिसत आहे. पण तालुक्‍याबाहेरील काही लोक येऊन वाळपईच्या जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्यास जनता बळी पडणार नाही व भाजपला (BJP) प्रचंड बहुमतांनी निवडून आणणार आहे. मतदारसंघात आपल्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

- विश्‍‍वजीत राणे, आरोग्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com