Babu Ajgaonkar
Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar : आगामी निवडणूक पेडण्यातूनच लढवणार; बाबू आजगावकरांचा एल्गार

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे हीच माझी खरी कर्मभूमी आहे. या मतदारसंघात एकही घर असे नसेल जिथे मी काम केलेले नाही. आगामी निवडणूक लढायची असेल, तर मी याच मतदारसंघातून लढेन, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केली.

मागची विधानसभा निवडणूक आजगावकर यांनी मडगाव मतदारसंघातून लढविली होती आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या त्यांनी दवर्ली येथील घरांच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना तुम्हाला नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे का? असे विचारले असता, पेडणे हाच माझा मतदारसंघ असल्याचे ते म्हणाले.

‘दवर्लीत मी स्वतःहून गेलो नव्हतो’

दवर्ली येथे मी स्वतःहून गेलो नव्हतो. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी भाजप उमेदवार परेश नाईक यांच्या प्रचारासाठी मला बोलावले होते. प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्या लोकांच्या काही समस्या असल्यास त्याकडे लक्ष द्या असे मला सांगितले होते. त्यानुसार मी त्यांना घरांना क्रमांक मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. स्थानिक आमदार तुयेकर यांनीही या प्रस्तावाला होकार दिला होता, असा खुलासा आजगावकर यांनी केला.

‘...तर मी त्यांच्यावर अन्याय होऊ दिला नसता’

सध्या मोपा विमानतळावर स्थानिक टॅक्सीवाल्यावर अन्याय होत आहे. ते सर्व टॅक्सीचालक गोवेकर असून त्यांना तिथे स्टँड मिळावे यासाठी त्यांना बिगर गोमंतकीयांचे पाय धरावे लागतात ही दुर्दैवाची बाब आहे. मी जर पेडण्याचा आमदार असतो, तर त्यांच्यावर असा अन्याय होऊच दिला नसता, असे आजगावकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सरकारी यंत्रणेचा वापर; युरी आलेमाव यांचा आरोप

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT