Babu Ajgaonkar

 
दैनिक गोमन्तक
गोवा

बाबूंना भाजपकडून मडगावची ऑफर

आजगावकरांचा मात्र पेडण्यातूनच लढण्याचा निर्धार

दैनिक गोमन्तक

मडगाव : पेडणे मतदारसंघातून भाजपने प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे तिथे पक्षासाठी डोईजड झालेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मडगावातून उभे राहावे अशी ऑफर कार्यकारणीकडून देण्यात आली आहे. बाबू मडगावात राहिल्यास गटबाजीवरही आपोआप नियंत्रण येईल असे भाजपला वाटते. मात्र, आपल्याला मडगावातून निवडणूक लढविण्यास रस नाही असे आजगावकर यांनी कळविले.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, की आम्ही बाबूंना मडगावातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली आहे. कारण त्यांना मडगावात (Margaon) भक्कम बेस आहे. भाजप उमेदवारीवर ते सहज जिंकू शकतात असा विश्‍वास तानावडेंनी व्यक्त केला. मडगावात बाबूंची स्वतःची ३ आणि भाजपची ६ ते ७ हजार मते आहेत. मडगाव सर करायला एवढी मते पुरेशी आहेत अशी भाजप नेत्यांची धारणा आहे.

दरम्यान मला अशी ऑफर होती. मडगावचा असलो तरी पेडणे (Pedne) ही माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मडगावामधून उभे राहण्याची इच्छा नाही, हे मी पक्षाला कळवले आहे, असे बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT