Babu Ajgaonkar Meets CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

सोनसडो कब्रस्तानच्या प्रश्नावरून बाबू आजगावकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गेल्या 40 वर्षांपासून कब्रस्तानचा मुद्दा प्रलंबित असून मुस्लिम मते मिळवण्यासाठी कामत यांनी मुस्लिम समाजाला खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकली, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसचे दिगंबर कामत यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी शुक्रवारी शहराचा प्रलंबित कब्रस्तानाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत मडगावमध्ये भाजप (BJP) काँग्रेसचा पराभव करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Babu Ajgaonkar Meets CM Pramod Sawant over Graveyard Issue)

आजगावकर म्हणाले की, "आम्ही सोनसडो येथील कब्रस्तानसाठी निश्चित केलेली जमीन परत करावी, अशी मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली आहे. त्यांनी अधिका-यांना जमिनीचे झोनिंग बदलण्याचे निर्देश दिले आहेत. कब्रस्तानसाठी ही जागा तात्काळ जामा मशिदीला देण्यात यावी."

"गेल्या 40 वर्षांपासून कब्रस्तानचा मुद्दा प्रलंबित असून मुस्लिम मते मिळवण्यासाठी कामत यांनी मुस्लिम समाजाला खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकली. दक्षिण गोव्यात एकूण मुस्लिम लोकसंख्या सुमारे 80,000 आहे",असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आजगावकर हे सध्या पेडणेचे (Pernem) आमदार आहेत. ते म्हणाले, "मी पक्षाचा निष्ठावान सैनिक असून पक्ष बदलणार नाही. जर पक्षाला मी मडगावमधून निवडणूक लढवायची असेल तर मी मडगावमधून निवडणूक लढवणार आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT