Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Babu Ajgaonkar: 'बाबू आजगावकर यांची दादागिरी खपवून घेणार नाही'

Goa: बाबू आजगावकर हे सरपंच हर्क्युलान नियासो यांच्यावर दबाव आणत असून त्यांना धमकी देत असल्याचा आरोप भाजपचे एसटी नेते अँथनी बार्बोझा यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Babu Ajgaonkar: दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधलेल्या 165 बेकायदेशीर घरांना पंचायतीने घर क्रमांक द्यावेत, यासाठी माजी आमदार बाबू आजगावकर हे सरपंच हर्क्युलान नियासो यांच्यावर दबाव आणत असून त्यांना ते धमकी देत असल्याचा आरोप भाजपचे एसटी नेते अँथनी बार्बोझा यांनी केला आहे. आजगावकर यांची ही दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधलेली ही घरे पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांच्याकडे घराच्या मालकीची कुठलीही कागदपत्रे नाहीत. अशा घरांना कायदेशीर करावे, अशी मागणी आजगावकर कसे करू शकतात, असा प्रश्र्न बार्बोझा यांनी केला.

ही बेकायदा घरे बिगर गोमंतकीयांची असून त्यांच्यासाठी आजगावकर मूळ गावकर असलेल्या सरपंचांवर दबाव का आणतात, असा सवालही त्यांनी केला आहे.

दवर्ली येथील एका वाड्यावर ही घरे असून दुसऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून ती बांधली आहेत. या घरांना पंचायतीने घर क्रमांक द्यावेत, असे अर्ज 165 जणांनी केले होते. मात्र, त्यांच्याकडे घरमालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT