Babu Ajgaonka And Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2022: बाबू अन् बाबा मडगावात दुसऱ्यांदा आमने सामने

1994 साली बाबू आजगावकर यांनी बाबा म्हणजेच दिगंबर कामत यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: उपमुख्यमंत्री तथा आगामी विधानसभा निवडणुकीतील (Goa Assembly Election) मडगावचे भाजपचे उमेदवार मनोहर उर्फ बाबू आजगावकर (Babu Ajgaonka) हे मडगावात प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत, असे नव्हे. तर 1994 साली बाबू आजगावकर यांनी बाबा म्हणजेच दिगंबर कामत (Digambar Kamat ) यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक (Election) लढवली होती. त्यावेळी दिगंबर कामत हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते.

त्यावेळी दिगंबर कामत (Digambar Kamat ) यांच्याविरुद्ध एकूण 12 उमेदवार होते. दिगंबर कामत यांना 5009 मते पडली होती व बाबू यांना 1335 . बाबू आजगावकर (Babu Ajgaonka) चौथ्या स्थानावर होते. त्यानंतर दिगंबर या मतदारसंघात सहा वेळा निवडून आले. त्यात दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर. बाबू मात्र धारगळ व पेडणेतून (Pernam) निवडून आले. पण, आता 28 वर्षांनंतर दोघेही दुसऱ्यांदा एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे आहेत. बाबू भाजप तर बाबा कॉंग्रेसच्या उमेदवारीवर.

दोघांसाठी ही निवडणूक आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे. बाबू जरी धारगळ व पेडणेत असले तरी त्याची मडगावातील आपली पकड मजबूत आहे हे सिद्ध करण्यासाठी यावेळी ते प्रयत्न करतील. मोती डोंगर, बाबू नगरी, आझाद नगरी, फकीर बांद, खारेबांद, गांधी मार्केट व प्रभाग 14 या भागावर कामत यांची मदार आहे व याच भागातील मतदारही बाबूंना आपले नेते मानतात. त्यामुळे या भागातील मतांवरच त्यांचे भवितव्य असेल.

तृणमूलने नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांना डावलून महेश आमोणकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे आमोणकर यांची मदारही याच मतदारांवर असल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=JcjNtcNZLBU

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT