B L santosh  Dainik Gomantak
गोवा

B L Santosh Visit: भाजप नेत्यांची मंगळवारपासून कसोटी! राष्ट्रीय सचिव संतोष होणार गोव्यात दाखल; 'मंत्रिमंडळ' विषय ऐरणीवर

B L santosh Goa Visit: संतोष यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी आपले कार्यक्रम वाढवले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी अचानकपणे इस्पितळांना भेटी देणे सुरू केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल.‌ संतोष मंगळवारी राज्यात डेरेदाखल होणार आहेत. यामुळे गेले वर्षभर अधूनमधून चर्चेत येणारा मंत्रिमंडळ फेरबदल आणि प्रदेश भाजप पातळीवरील मोक्याची पदे हा विषय ऐरणीवर आला आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा कार्यकाळ संपल्यासोबतच भाजपच्या सर्व समित्या बरखास्त झाल्या आहेत. मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशीच पदे अलीकडे झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत भरण्यात आली आहेत. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे आपल्यासाठी सहकारी म्हणून कोणाला निवडतात याचीही उत्सुकता आहे.

संतोष हे मुख्यमंत्री आणि इतर‌ मंत्र्यांशी एकत्रित आणि स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. मंत्र्यांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्री व‌ प्रदेशाध्यक्ष यांचे आकलन आणि भाजपच्या राज्यातील हितचिंतकांनी थेट दिल्लीत दिलेला याबाबतचा अहवाल या आधारे ही चर्चा होणार आहे.

या चर्चेत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या संभाव्य हालचालींची बिजे असतील अशी‌ माहितीमिळाली आहे.प्रदेशाध्यक्ष दामू यांनी संतोष यांना सादर करण्यासाठी अहवाल तयार केला आहे.

त्यात आगामी निवडणुकीत कोणाकोणाची कुठे मदत‌ होऊ‌ शकते. राजकीय हालचाली सुरळीत होण्यासाठी कसे नेपथ्य हवे याविषयी त्यांची मते या अहवालात प्रतिबिंबित झालेली असतील असे‌ सूत्रांचे म्हणणे आहे.

सिद्धार्थ सरचिटणीसपदी?

पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी येऊ शकते. सध्या प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत सावलीसारखे ते वावरत आहेत. प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलेले ॲड. नरेंद्र सावईकर यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली जाऊ शकते. प्रदेश खजिनदारपदी संजीव देसाई कायम राहतील असे दिसते. 

धोंड यांना परत आणणार?

प्रदेश संघटन सचिवपदी सतीश धोंड यांना‌ परत आणावे असे अनेक नेते, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. संतोष यांच्या धोंड यांच्याबाबतच्या तीव्र भावना लक्षात घेता नवे प्रदेशाध्यक्ष दामू हे‌ धोंड यांचा विषय त्यांच्यासमोर काढतील का याविषयी उत्सुकता आहे. धोंड सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. 

राज्य प्रभारींची निवड शक्य

राज्य प्रभारी आशिष सूद हे दिल्ली सरकारमध्ये मंत्री झाल्याने नवा प्रभारी कोण याविषयी सुतोवाच या दौऱ्यादरम्यान होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पातळीवर अद्याप संघटनात्मक निवडणूक न‌ झाल्याने प्रभारीची नियुक्ती थोड्या विलंबाने होईल असे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सक्रिय

संतोष यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी आपले कार्यक्रम वाढवले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी अचानकपणे इस्पितळांना भेटी देणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री दिवसभरात सहा सहा कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले आहेत.

‘महालक्ष्मी’वर झाली बैठक

संतोष यांचा गोवा दौरा झाल्यानंतर संघटनात्मक आणि सरकारच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाईक, माजी खजिनदार देसाई आदी उपस्थित होते. संतोष यांच्यासमोर मांडण्यासाठीच्या मुद्यांची उजळणी या बैठकीत झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेषतः संघटनात्मक कामासाठी कोणत्या मंत्र्याचा सक्रिय सहभाग असतो/नसतो यावरही ऊहापोह करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT