Ayush Health Services Goa PIB
गोवा

जुनाट आजार बरे होईनात? रायबंदर येथे 'आयुष' आरोग्य केंद्रात घ्या उपचार - मुख्यमंत्री सावंत

रायबंदर येथे आयुष आरोग्य सेवांचे उद्घाटन; आयुर्वेद, युनानी आणि संशोधन केंद्रांचा समावेश

Pramod Yadav

Ayush Health Services Goa

रायबंदर येथे आयुष आरोग्य सेवांचे उद्घाटन करण्यात आले. आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनवाल आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (दि.14) हे उद्धाटन करण्यात आले.

याठिकाणी युनानी क्लिनिक, क्लिनिकल संशोधन, सिद्ध क्लिनिकल संशोधन केंद्र, होमिओपॅथीचे क्लिनिकल संशोधन केंद्र आणि आयुर्वेद संशोधन (खनिज आणि सागरी) यांचा समावेश आहे.

शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या या उद्धाटन संमारंभाला केंद्रीय मंत्री सोनवाल आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित होते.

अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीने जुनाट आजार बरे होत नसतील तर, अशा लोकांनी आयुष आरोग्य केंद्राला भेट देऊन उपचार घेऊ शकतात. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

तसेच, नव्याने उदघाटन झालेले आयुष आरोग्य सेवा केंद्र 'स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् अतुरस्य विकारप्रशमनम् च' म्हणजे आयुष केंद्र औषधाच्या प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करेल. असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.

Ayush Health Services Goa

'गोवा राज्यात या संशोधन संस्था स्थापन केल्याबद्दल मी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे आभार मानतो. गोवा आयुष हेल्थकेअर हब बनण्याच्या दिशेने पुढे येत आहे. या संस्थांसह गोव्याने भारतातील वैद्यकीय पर्यटन केंद्र बनण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.' असे सावंत म्हणाले

गरजू सर्वसामान्य लोकांसाठी ओपीडी, दवाखाना, पंचकर्म याबाबत तरतूद करण्यात आली आहे. खनिज आणि सागरी औषधांवर लक्ष केंद्रित करून संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा, संग्रहालय आणि ग्रंथालय देखील या परिसरात विकसित केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT