Goa CM Dr. Pramod Sawant CM Sawant X Handle
गोवा

Goa Hospital: गरिबांसाठी मोफत उपचार, गोव्यात सुरु होतोय 50 बेडचा दवाखाना; कुठे, कधीपासून मिळणार सुविधा? जाणून घ्या

Goa Hospital: 10.36 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात ५० बेडची सुविधा आहे. येथे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांवर मोफत उपचार केले जातील.

Pramod Yadav

डिचोली: येथे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधोपचार रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि आरोग्यम अंतर्गत ५० बेड क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

रुग्णालयाची इमारत सोमवारी (०२ डिसेंबर) दीनदयाल हेल्थ केअर हॉस्पिटलची इमारत दीनदयाल जनसेवा प्रतिष्ठानला सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

10.36 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात ५० बेडची सुविधा आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांवर मोफत उपचार केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आरोग्यमचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आभार मानले.

आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मी IOCL चे मनापासून आभार मानतो. आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल मी दीनदयाल को ऑप सोसायटी ट्रस्टचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कधीपासून सुरु होणार रुग्णालय?

डिचोली येथे उभारण्यात आलेले आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधोपचार रुग्णालय येत्या चार ते पाच महिन्यात सुरु होईल, असेही सावंत म्हणाले. अशा पद्धतीचे गोव्यातील हे पहिले रुग्णालय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या रुग्णालयाचा राज्यात येणारे पर्यटक, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांना देखील फायदा होणार आहे. खेड्या, गावातील नागरिकांसाठी रुग्णालयाची सेवा पुरवण्याचा उद्देश आहे. डिचोली तालुक्यात हे रुग्णालयात होत असल्याचा मला आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT