Mauvin Godinho Ram Temple Movie Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे ख्रिस्ती मंत्री म्हणतात, "आपण मूळचे हिंदू"; राममंदिरावरील सिनेमाबाबत दिली सर्व माहिती

Mauvin Godinho: . पुढील दीड वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत बोलताना स्‍पष्‍ट केले.

Sameer Panditrao

पणजी: आपण मूळचा हिंदू असल्‍याचा आपल्‍याला अभिमान आहे. हिंदू धर्मियांची संस्‍कृती आणि ओळख जगभर पोहोचवण्‍याच्‍या उद्देशानेच आपण अयोध्‍येवर आधारित ‘जन्‍मस्‍थान’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. पुढील दीड वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल, असे मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत बोलताना स्‍पष्‍ट केले.

अयोध्‍येबाबतचा कायदेशीर लढा सुमारे १६१ वर्षांपासून सुरू होता. अखेर २०१९ यावर शिक्‍कामोर्तब होऊन ही जागा हिंदूंच्‍या ताब्‍यात आली आणि त्‍यानंतर तेथे राममंदिरही उभे राहिले. हा लढा नेमका कसा होता, यात काय काय घडले, याचा इतिहास हिंदू आणि मुस्‍लिम या दोन्‍ही धर्मियांसमोर मांडण्‍यासाठीच आपण आणि मनोज नोटियाल यांनी यावर आधारित चित्रपट बनवण्‍याचे कोविड काळात निश्‍चित केले.

त्‍यानंतर आम्‍ही यासंदर्भात सुमारे तीन वर्षे अभ्‍यास, संशोधन केले. सर्वोच्च न्‍यायालयाने याबाबत दिलेल्‍या अंतिम निवाड्याचा पूर्ण अभ्‍यास केल्‍यानंतरच या चित्रपटाची निर्मिती करण्‍याचे आम्‍ही ठरवले. तूर्तास या चित्रपटाचे नाव ‘जन्‍मस्‍थान’ असे निश्‍चित करण्‍यात आले आहे.

पुढील महिन्‍यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्‍यात येणार आहे. दीड वर्षानंतर हे चित्रीकरण पूर्ण होऊन हा चित्रपट चित्रपटगृहांमध्‍ये झळकेल, असे गुदिन्‍हो यांनी सांगितले. चित्रपटातील प्रमुख अभिनेते, अभिनेत्री ठरवण्‍यासाठी अनेक कलाकारांशी संपर्क साधला जात असल्‍याचे नमूद करताना, त्‍यांची नावे जाहीर करण्‍यास मात्र गुदिन्‍हो यांनी नकार दिला.

चार चित्रपटांमध्‍ये करणार होतो काम

चित्रपटांशी तसा माझा जवळचा संबंध आहे. १९७७ मध्‍ये मी फिल्‍म आणि टेलिव्‍हिजन इन्‍स्‍टिट्यूटमध्‍ये होतो. त्‍यावेळी आपण चार चित्रपटांमध्‍ये कामही करणार होतो. परंतु काही कारणांमुळे ते सोडून आपल्‍याला गोव्‍यात यावे लागले, असेही मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT