Ayodhya Ram Mandir  Dainik Gomantak
गोवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राममूर्तीचे लोभस ‘दर्शन’ दृष्टिक्षेपात; म्हैसूरचे अरुण योगिराज यांचे अद्वितीय कलाकौशल्य

Ayodhya Ram Mandir : देशभरातून भाविक दाखल श्रीरामलल्लाची मूर्ती ही बालरूपातील आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य असलेल्या या श्रीरामलल्लाच्या सर्वांगावर विविध आभूषणे आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राममंदिरातील गर्भगृहात विराजमान करण्यात आलेल्या राममूर्तीची काही छायाचित्रे शुक्रवारी काही माध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत.

विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने ही छायाचित्रे प्रसिद्ध केल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथील कलाकार अरुण योगिराज यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. सध्या या मूर्तीचे नेत्र पिवळ्या वस्त्राने झाकण्यात आलेे आहेत.

काळ्या पाषाणात घडविण्यात आलेल्या या मूर्तीची उंची ५१ इंच आहे. श्रीरामलल्लाची मूर्ती ही बालरूपातील आहे. चेहऱ्यावर स्मितहास्य असलेल्या या श्रीरामलल्लाच्या सर्वांगावर विविध आभूषणे आहेत.

ही आभूषणे अत्यंत रेखीवपणे कोरण्यात आलेली आहेत. कमळावर उभ्या असलेल्या श्रीरामलल्लांच्या मागे पाषाणाचीच प्रभावळ असून त्यावर गरुड आणि हनुमंत कोरण्यात आलेले आहेत.भगवान विष्णूंच्या दशावतारांच्या मूर्तीही या प्रभावळीवर कोरण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे शंख, चक्र, गदा, पद्म, सूर्य, गणपती, प्रणव आणि स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरण्यात आलेली आहेत. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

देशाच्या कल्याणाचा ‘प्रधान संकल्प’

गुरुवारी दुपारनंतर ही मूर्ती राममंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ‘प्रधान संकल्प विधी’ मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला असल्याची माहिती मंदिर ट्रस्टने दिली.

दर्शनाची ओढ अनिवार

अयोध्या ः अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी काही भाविक हे पायी, काही सायकलवरून तर काही चक्क स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल झाले. वाटेत येणाऱ्या अडचणी आणि थंडी-वाऱ्याची तमा न बाळगता मैलोन्‌मैल प्रवास करत हे भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

बिहारमधील मधेपूर जिल्ह्यातील नितीशकुमार हे सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करत अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Goa Politics: 'आमच्या उमेदवारांची चिंता तुम्हाला का?' सत्ताधारी भाजपला आपने डिवचले

Viral Video: 19 मिनिटांचा 'तो' व्हायरल व्हिडिओ शेअर कराल तर याद राखा, पोलिसांनी दिली तंबी; काय आहे नेमकं प्रकरण?

'रोमिओ लेन'वर बुलडोझर ॲक्शन! मालक फरार होताच CM सावंतांचे फर्मान, पाडकाम पथके सज्ज; कोणत्याही क्षणी होणार भुईसपाट

VEDIO: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की..! लंडनमध्ये गृहमंत्र्यांची गाडी अडकून पोलिसांनी केली तपासणी; काय नेमकं घडलं?

SCROLL FOR NEXT