Drowned incedents in South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: खाण, पाणवठे येथे जाणे, पोहणे टाळा; साऊथ गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

हेल्पलाईन, नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर

Akshay Nirmale

South Goa Collector order: गोव्यात पावसाला चांगली सुरवात झाल्यानंतर अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे वर्षा पर्यटनालाही जोर आला. तथापि, राज्यात गेल्या आठवड्याभरात बुडून मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

त्या पार्श्वभुमीवर आता दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाणवठ्यांच्या ठिकाणी जाणे, अशा ठिकाणी पोहणे टाळा, अशा सूचना दिल्या आहेत.

दक्षिण गोवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, यंदाच्या मॉन्सून काळात दक्षिण गोव्यात बुडून मृत्यू होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, पर्यटकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी पावसाळ्यात पाणवठे, तलाव, नद्या, धबधबे, खाण, खड्डे इत्यादींमध्ये जाणे, तिथे आंघोळ करणे, पोहणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

बुडून मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी हे आवाहन केले गेले आहे. यामध्ये लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन/नियंत्रण कक्ष क्रमांक देखील नमूद केले आहेत.

बुडण्याबाबत अशी कोणतीही माहिती मिळाली तर जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक- 2794100, इमर्जन्सी सर्व्हिस- 112, अग्निशमन आणि इमर्जन्सी सर्व्हिस- 101, 7447746807 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील या परीपत्रकातून केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT