Illegal Constructions Canva
गोवा

Narve News: 'त्या' रेस्टॉरंटवर कारवाई कधी? ‘जीसीझेडएमए’चा आदेशाकडे संबंधितांचे दुर्लक्ष

Narve Ferry Jetty Illegal Restaurant: डिचोली तालुक्यातील नार्वे फेरी धक्क्याजवळ बेकायदेशीरपणे उभारलेला बार-कम-रेस्टॉरंट गोवा किनारा क्षेत्रीय व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Narve Ferry Jetty Illegal Restaurant

पणजी: डिचोली तालुक्यातील नार्वे फेरी धक्क्याजवळ बेकायदेशीरपणे उभारलेला बार-कम-रेस्टॉरंट गोवा किनारा क्षेत्रीय व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते बांधकाम वाचविण्यासाठी संबंधित मालकाने राजकारण्यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आदेश असूनही कारवाई करण्यात येत नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नदी जलवाहतूक विभाग, तसेच डिचोलीतील नगर नियोजन विभागाचे (टीसीपी) उपनगर नियोजक यांनी संयुक्तपणे जीसीझेडएमएकडे या फेरी रॅम्पच्या पुढील रस्त्याच्या बांधकामाबाबत तक्रार केली होती. जीसीझेडएमएने जानेवारी महिन्यात वर्षाच्या सुरुवातीला तपासणी केली होती. त्या तपासणीत ते बांधकाम २०११ च्या कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) अधिसूचनेचे पूर्णपणे उल्लंघन करत आहे. ते उभारलेले बांधकाम सीआरझेड-३ क्षेत्रामध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसून आले आहे.

या बांधकामामुळे किनारा क्षेत्रास व खारफुटीच्या बफर झोनचाही या परिसराला फटका बसला असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार कम रेस्टॉरंटच्या मालकास जीसीझेडएमएने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याशिवाय नदी परिवहन खात्याने या बांधकामाविषयी नार्वे पंचायतीकडे त्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात माहिती मागवून घेतली होती.जीसीझेडएमएने २४ सप्टेंबर २०२४ रोजीच्या आपल्या आदेशात हे बांधकाम बेकायदेशीर ठरवले आहे.

सीआरझेड नियमांचे उल्लंघन

सदर बांधकाम पूर्णपणे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणारे आहे. नार्वे फेरी धक्क्याशेजारील हे बांधकाम फेरी बोटीच्या व वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे देखील आढळून आले आहे. त्यामुळे ते हटविणे आवश्यक आहे. प्राधिकरणाने काढलेल्या आदेशाच्या तारखेपासून एका महिन्यात ते बांधकाम हटवावे, असेही डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले होते. तरीही हे बांधकाम अद्याप हटविण्यात आले नाही. त्यामुळे ते बांधकाम वाचविण्यासाठी संबंधित मालकाची धडपड सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Cattle Transport: बेतोडा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; तीन गुरांची सुटका

Omkar Elephant: 'आता गोवाच मदत करू शकतो', ओंकारची महाराष्ट्रात फरपट; सिंधुदुर्गातील नागरिकांचे मंत्री राणेंना आवाहन

IFFI Goa 2025: गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय? आणखी एक ‘फ्लॉप’ आवृत्ती..

Goa Live News: रुमडामावाडा येथे 'रॅश ड्रायव्हिंग'मुळे भीषण अपघात; 55 वर्षीय स्कूटरस्वाराचा मृत्यू

Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT