Goa Government: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या पदावरील आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप युवक काँग्रेसने बुधवारी (ता.३१) केला.
आयोगाच्या संकेतस्थळावर अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (ता.३०) सायंकाळी ती हटवण्यात आल्याकडे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जोएल आंद्रादे यांनी लक्ष वेधले.
या पदांवरील आरक्षण रद्द करून ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या आयोगाच्या प्रयत्नांचा युवक काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना असलेल्या ‘एनएसयूआय’ने निषेध केला आहे.
एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष नौशाद चौधरी, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एहराज मुल्ला आदींनी पत्रकार परिषद घेऊन या अन्यायाला बुधवारी वाचा फोडली.
एससी, एसटी आणि ओबीसी पदे ‘अनारक्षित’ करून सर्वसाधारण प्रवर्गात भरण्याच्या यूजीसीच्या प्रयत्नाचा एनएसयूआयने निषेध केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.