Vasco Crime News:  Dainik Gomantak
गोवा

Vasco : वास्कोत मनोरुग्णाचा पेट्रोल पंपावर हल्ला

गाड्यांचीही तोडफोड : लोकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vasco : जोशी पेट्रोलपंपाजवळ एका मनोरुग्णाने गाड्यांची तोडफोड करून नंतर पेट्रोलपंपाचे मीटर फोडले. मनोरुग्णाला लोकांनी चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळी साडे दहा वाजता जोशी पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती हातात काठी घेऊन धावत आला आणि तिथे पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. नंतर त्याने जोशी पेट्रोलपंपाच्या दिशेने धाव घेऊन पेट्रोलपंपावरील मीटरची नासधूस केली.

पेट्रोलपंपावर तीन महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी कामावर होते. सदर इसम धुडगूस घालत असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. गाडीत पेट्रोल घालण्यासाठी आलेल्या वाहनचालकांनीही घाबरून पळ काढला.

सदर इसम नासधूस करत असल्याचे पाहून काही लोकांनी त्याला ताब्यात घेऊन चोप दिला आणि त्यानंतर त्याला दोरीने बांधून ठेवून पोलिसांना माहिती दिली.

पोलिस स्थानकात नेऊन त्याची चौकशी केली असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. त्या इसमाच्या वडील पोलिस स्थानकात येऊन तो मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र पोलिसात दाखल केले. चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT