Goa ATS Officer Bribery Case : अतिरेकीविरोधी पथकातील पाच पोलिसांनी दक्षिणेतील मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचे उघड झाले तरी अजूनही त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई झालेली नाही. यातील काही पोलिसांनीच राजकारण्यांमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याने त्यांचे निलंबन न होता फक्त त्यांची वाळपईतील प्रशिक्षण केंद्रात रवानगी केली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा अधीक्षक पदावरील अधिकारी आहे. तक्रारदारानेही तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशी सुरू असली तरी अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रक्कम मोठी असल्याने पर्दाफाश
मनी लाँडरिंग व्यावसायिकांचे अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या कारणास्तव ही लाच मागितली जाते. हे व्यावसायिक ती यापूर्वीही या पथकाला देत आले आहेत. यावेळी ही रक्कम व्यावसायिकाच्या आवाक्याबाहेर होती. त्यामुळे या एटीएस पोलिसांचाच पर्दाफाश करत त्यांना बदनाम केले.
कारवाईत चालढकल का? :
लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलिस महासंचालकांनी सुरू केली आहे. यापूर्वी लाचप्रकरणी कित्येकांवर त्वरित निलंबनाची कारवाई झाली किंवा तडकाफडकी बदल्याही केल्या आहेत. त्यामुळे या पोलिसांबाबत कारवाईत चालढकलपणा का, असा प्रश्न काही पोलिसांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.