Goa ATS Officer Bribery Case Dainik Gomantak
गोवा

ATS Officer Bribery Case : ‘एटीएस’ खंडणी वसुली प्रकरण तक्रारीअभावी दडपण्याचा प्रयत्न; राजकीय हस्तक्षेप

अधिकाऱ्यांचा सहभाग; नाममात्र चौकशी

दैनिक गोमन्तक डिजिटल

ATS Officer Bribery Case :  ‘एसटीएस’ पथकाच्या पोलिसांच्या खंडणी वसुलीप्रकरणी व्हिडिओ क्लिपवरून प्राथमिक चौकशी सुरू केली असली तरी त्यामध्ये तक्रार देण्यास संबंधित मनी लाँडरिंग व्यावसायिक पुढे येत नसल्याचे कारण देऊन तसेच सरकारी पातळीवरून दडपण आल्याने हे प्रकरण पोलिस दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

या पोलिसांविरुद्ध कारवाईही झालेली नाही. या चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्दाफाश होणार असल्याने ही चौकशी नाममात्र केली जात आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

खंडणी वसुली संदर्भातचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर पोलिस महासंचालकांनी त्याची दखल घेत प्राथमिक सुरू केली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याने चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. या अधिकाऱ्याला ईमेल समन्स बजावले, तरी त्याला आजपर्यंत उत्तर दिले गेले नाही.

पाच एटीएस पोलिसांची प्राथमिक चौकशी केली आहे. खंडणी वसुलीसाठी जे तीन एटीएस हवालदार व दोन कॉन्स्टेबल्स गेले होते त्यांची माहिती उघड झाली असली तरी पोलिस प्रमुखांनी ती सोशल मिडीयापर्यंत पोहचू नये याची पूर्ण सावधगिरी बाळगली आहे.

ज्याच्याकडून ही खंडणी वसुली घेण्यात आली होती, त्याला पैसे परत केल्याने त्याला तक्रार नको आहे, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांनीही त्याला मनी लाँडरिंग व्यवसायात अडचणी येऊ शकतो, अशी धमकी दिली आहे, असे सूत्राने माहिती दिली.

तक्रारीनंतर तपास शक्य!

एखादी तक्रार आल्याशिवाय तपास करणे शक्य नाही, असे मत पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सध्या गाजत असलेल्या एटीएस खंडणीवसुली संदर्भात विचारले असता व्यक्त केले.

जर एखाद्याने आरोप केले असतील तर त्याची चौकशी किंवा तपास करण्यासाठी तक्रारीची आवश्‍यकता आहे. त्यासाठी लेखी तक्रार हवी व तक्रारदारही हवा तरच त्याचा तपास करणे शक्य आहे. कथित आरोपांच्या आधारे कोणाच्याही जबान्या नोंद करता येत नाहीत. दिशाहीन आरोपानुसार पोलिस त्याची दखल घेऊन कारवाई करू शकत नाही, असे सिंग म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT