JEE Main Exam|Goa News Dainik Gomantak
गोवा

JEE Main Result 2023: जेईई मेन परीक्षेत अथर्व गोव्यातून अव्वल

आयआयटीसारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल काल जाहीर झाला.

दैनिक गोमन्तक

JEE Main Result 2023 Goa: आयआयटीसारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल काल जाहीर झाला. यामध्ये कुजिरा येथील मुष्टिफंड आर्यन उच्च माध्यमिकचा विद्यार्थी अथर्व विजय नाईक याने गोव्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

त्याला 99.71 टक्के गुण मिळाले आहेत. त्याशिवाय 99 टक्क्यांवर अधिक गुण मिळविणारे आठजणांचा समावेश आहे. जानेवारीमध्ये ही परीक्षा झाली होती.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने जेईई परीक्षा घेतली जाते. संशोधन-आधारित वैध, विश्वासार्ह, कार्यक्षम, पारदर्शक, निष्पक्ष, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन विकसित आणि प्रशासित करून शिक्षणातील समानता आणि गुणवत्ता सुधारण्याच्या मिशनसह प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते.

99 टक्क्यांवर अधिक गुण मिळविणाऱ्या सात जणांबरोबरच 98.5 ते 99 टक्क्यांपर्यंत सात विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले आहेत. गतवर्षी 99 टक्क्यांवर गुण मिळविणारे 12, तर 98.5 ते 99 च्या मध्ये गुण मिळविणारे 3 विद्यार्थी होते.

दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये

एनटीएने जेईईची 2023 ची मुख्य परीक्षा देशाबाहेरील 17 शहरांसह 287 शहरांमध्ये सुमारे 547 केंद्रांवर घेण्यात आली होती. संगणकावर आधारीत ही चाचणी परीक्षा होती. देशभरातील एकूण 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले.

तर या परीक्षेसाठी 8.60 लाख विद्यार्थी बसले होते. जेईईच्या मेन 2023 ची दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. या परीक्षाला जे विद्यार्थी बसतील त्यांचे दोन्ही सत्रांपैकी सर्वाधिक गुण गृहित धरले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

SCROLL FOR NEXT