BJP Meeting In Bicholim  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत भाजपच्या बैठकीत खडाजंगी

पाटणेकर निर्णयावर ठाम : कार्यकर्त्यांचा कुंदन फळारींना पाठिंबा

दैनिक गोमन्तक

डिचोली : सभापती राजेश पाटणेकर यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर उदभवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बोलावलेली भाजपच्या नेतेे-कार्यकर्त्यांची बैठक (Bicholim) खडाजंगी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे (BJP Meeting In Bicholim) गाजली. पाटणेकर यांचे मन वळवण्याचे यत्न ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले. मात्र पाटणेकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

या बैठकीस पाटणेकर तसेच भाजप उमेदवारीच्या आणखी एक दावेदार शिल्पा नाईक उपस्थित होत्या. पाटणेकर यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे ती मलाच मिळायला हवी, असे नाईक यांनी सांगितले असता, काहीजणांनी पक्षश्रेष्ठींकडून नरेश सावळ आणि चंद्रकांत शेट्ये यांना झालेल्या विचारणेचा संदर्भ देत नाईक या कमकुवत उमेदवार असल्याचे सूचित केले. यावरून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. 2017 सालच्या निवडणुकीत नाईक यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी काम केले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

शिल्पा नाईक यांना झुकते माप

पक्षाने शिल्पा नाईक यांना उमेदवारी द्यावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन यावेळी राजेश पाटणेकर यांनी दिले. मात्र, शहरी भागातील कार्यकर्त्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. योग्य उमेदवार मिळाला नाही तर पक्षातील दुहीमुळे प्रचारावरही परिणाम होण्याची चिन्हे या बैठकीत दिसून आली. डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या नावाला पालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. फळारी हे विधानसभा राजकारणात नवे असले तरी पक्ष संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्यास ते तुल्यबळ ठरू शकतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करताना दिसले.

निर्णयाविनाच बैठक आटोपली

या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी नाव न घेता भाजप संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचा उद्धार केला. या पदाधिकाऱ्याच्या छुप्या कारवायांमुळेच पाटणेकर यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला. या पदाधिकाऱ्याच्या पक्षद्रोही कृत्याची दखल पक्षाने घ्यावी, असे मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. मात्र, महत्त्वाची बैठक असली तरी तिला एकही राज्यस्तरीय नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपती घेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT