Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Assembly Election 2022 : राज्यात 14 फेब्रुवारीला होणार मतदान, मतमोजणी 10 मार्चला

40 जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे

दैनिक गोमन्तक

निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले. निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासह, राज्यांमध्ये अधिसूचना लागू झाली. गोव्यात एका टप्प्यात निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याचबरोबर पाच राज्यांतील मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. 28 जानेवारीला अर्ज करण्याची शेवटची तारीख आयोगाने जाहीर केली आहे. 29 जानेवारी उमेदवारांचे अर्ज पडताळणी होणार आहे. तर 31 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

40 जागांच्या गोवा (goa) विधानसभेचा (Assembly) कार्यकाळ 15 मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2017 मध्ये झाल्या होत्या. यावेळी केवळ काँग्रेस आणि भाजपच नाही तर ममता बॅनर्जींची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीही जोरदार प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT