Goa Loud Music Issue Canva
गोवा

Loud Music Issue: रामा परबना केला ‘बळीचा बकरा’? ड्युटी ठरवून देणाऱ्यावरच कारवाई का?

Anjuna Protest: ध्वनिप्रदूषणाकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी त्याचे खापर ड्युटी मास्तर रामा परब यांच्यावर फोडण्यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आसगाव येथील ध्वनिप्रदूषणाकडे काणाडोळा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी त्याचे खापर हणजुणे पोलिस ठाण्याचे ड्युटी मास्तर रामा परब (बक्कल क्र. ६४५१) यांच्यावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता केवळ ड्युटी ठरवून देणाऱ्यावरच कारवाई का? असा प्रश्‍‍न आता विचारला जाऊ लागला आहे.

कोणाला कुठे ड्युटी द्यायची हे ड्युटी मास्तर ठरवतात. हणजुणमध्ये ड्युटी ठरवताना परब पक्षपातीपणे वागतात. काही जणांनाच क्लब असलेल्या भागात ड्युटी देतात, अशा तक्रारी आमच्यापर्यंत पोचल्या होत्या, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले. त्याची प्राथमिक शहानिशा करण्यात आली. जनतेकडूनही काही विशिष्ट पोलिस कर्मचारीच त्या भागात कामावर, गस्तीवर असतात अशा तक्रारी आल्या होत्या. त्या सगळ्यांच्या ड्युटी परब हेच निश्चित करत होते.

अशीही चर्चा

१ पोलिस दलात सुरू असलेल्या चर्चेनुसार राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल हे काल मांद्रे येथे एका पाहणीसाठी जात होते.

२ वाटेत त्यांना आपल्याला पोलिस संरक्षण हवे असे वाटले. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षा अधिकाऱ्याने (जो पोलिस दलातीलच आहे) हणजुणे पोलिस ठाण्याशी संपर्क साधून पोलिस संरक्षणाची मागणी केली. पान ११ वर

३) त्यावर रामा परब यांनी ‘मांद्रे हे आपल्या कार्यकक्षेबाहेर असल्याने माफ करा’ असे नमूद केले.

४) ही बाब त्या सुरक्षा अधिकाऱ्याने मुख्य सचिवांच्या कानावर घातल्यावर त्यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना कल्‍पना दिली. त्यांनी तत्काळ परब यांच्‍या निलंबनाचा आदेश जारी केला.

५) नंतर हे सारे गैरसमजातून घडल्याचे हणजूण पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या लक्षात आले. ते परब यांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षकांना भेटले. मात्र मुख्य सचिवांशी संबंधित हे प्रकरण असल्याने त्यांनी निलंबनाचा आदेश मागे घेण्यास नकार दिला.

६) मुख्य सचिवांनी मात्र असे काही घडलेच नसल्याचे ‘गोमन्तक’ला सांगितले.

हणजूण पोलिस ठाण्याचे ड्युटी मास्‍तर रामा परब यांच्‍याबाबत तक्रारी आल्या होत्‍या. हणजूण पोलिस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला होता. त्‍यानंतर परब यांना निलंबित करण्‍यात आले.
अक्षत कौशल, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT