Loud Music Issue: ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! स्‍थानिकांचे सलग तिसऱ्या रात्री आंदोलन

Anjuna Loud Music: ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात थातूरमातूर कारवाई करू नका, संबंधितांना जरब बसवा, अशी मागणी
Anjuna Loud Music: ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात थातूरमातूर कारवाई करू नका, संबंधितांना जरब बसवा, अशी मागणी
Vagator Loud Music ProtestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात थातूरमातूर कारवाई करू नका, संबंधितांना जरब बसवा, अशी मागणी करत शनिवारी सलग तिसऱ्या रात्री स्‍थानिकांनी वागातोर येथे शांततेत आंदोलन केले. तत्‍पूर्वी, सकाळी आणखी दोघा संशयितांविरुद्ध हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आसगावजवळील रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांविरोधात आज कारवाई करण्यात आली. मात्र, जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोवर असे प्रकार सुरूच राहणार, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक पंचायतीने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करावेत. सध्या प्रशासन बहिरे झाले आहे.

आम्‍ही सलग तीन रात्री रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहोत. अद्याप कुठल्याच अधिकारी किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारलेला नाही. प्रशासकीय यंत्रणा जबाबदारीपासून हात झटकत आहे, असा दावा करण्‍यात आला.

Anjuna Loud Music: ध्‍वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात थातूरमातूर कारवाई करू नका, संबंधितांना जरब बसवा, अशी मागणी
'No Loud Music' कर्णकर्कश संगीतावर कारवाई करा! स्थानिकांचा हणजूण पोलिस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा!

काय घडत आहे?

स्वातंत्र्यदिनानिमित्त लागून आलेल्‍या सुट्यांच्‍या पार्श्वभूमीवर हणजूण, वागातोर या किनारी भागांतील काही रेस्टॉरंट्स व क्लबनी लेट-नाईट पार्ट्यांचे आयोजन केले होते. परिणामी, स्थानिकांनी या विरोधात आवाज उठवत, गुरुवार व शुक्रवार असे दोन सलग दोन रात्री मेणबत्त्या पेटवून न्यायासाठी टाहो फोडला.

स्वातंत्र्यदिनापासून लोकांनी पुकारलेल्या एल्गाराची दखल घेत, हणजूण पोलिस कार्यक्षेत्रातील काही जणांवर दाखविण्यापुरता कारवाईचा बडगा उगारण्‍यात आला.

या भागात मोठ्या प्रमाणात रेस्टॉरण्टवाटे रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसतील, अशा आवाजात संगीत वाजवून स्थानिकांची झोपमोड करून मानसिक त्रास देतात, असा आरोप होत आहे. तरीही पोलिसी कारवाई करण्‍यात चालढकलपणा करत असल्याचे लोकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa unregistered homestays action
Goa protests in last five years
Karapur One Goa Project Protest
Gen Z Movement India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com