Arrest Dainik Gomantak
गोवा

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Ganja seized in Goa: सहज उपलब्ध होणारा आणि दीर्घकाळ नशेत ठेवणारा अमलीपदार्थ म्हणून गांजाकडे पाहिले जाते. अलीकडे गोव्‍यात गांजाची तस्‍करी वाढली आहे. अनेकांना या प्रकरणी अटकही झालेली आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: सहज उपलब्ध होणारा आणि दीर्घकाळ नशेत ठेवणारा अमलीपदार्थ म्हणून गांजाकडे पाहिले जाते. अलीकडे गोव्‍यात गांजाची तस्‍करी वाढली आहे. अनेकांना या प्रकरणी अटकही झालेली आहे.

शनिवारी मध्‍यरात्री हणजूण पोलिसांनी आसगाव येथे छापा टाकून मूळ श्रीनगर-जम्मू काश्मीरच्या एका व्यक्तीकडून तब्बल ७.३० लाखांचा गांजा तसेच ७ लाखांची रक्कम हस्तगत केली.

संशयित आरोपी मक्सूद अहमद पटलू (५४. सध्‍या रा. आसगाव) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी छापा टाकून संशयितास ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ १ लाख ७० हजार रुपयांचा १७७० ग्रॅम गांजा सापडला. तसेच ५६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. त्‍याची किंमत ५ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. शिवाय ७ लाख रुपये रोख त्याच्याजवळील बॅगेत सापडले. ही कारवाई आसगाव येथील एका बार ॲण्‍ड रेस्टॉरंटजवळ करण्यात आली.

दरम्यान, न्यायालयाने संशयित मक्सूद अहमद पटलू याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT