Assagao High Tech Gambling Raid Dainik Gomantak
गोवा

Assagao: आसगावात 'हायटेक' जुगार; पहाटेच व्हिलावर टाकला छापा, रंगेहाथ पकडले; हणजूण पोलिसांची मोठी कारवाई

Assagao High Tech Gambling Raid: आसगाव-बार्देश येथे एका व्हिलामध्ये सुरु असलेल्या हायटेक ऑनलाईन जुगार अड्डयावर हणजूण पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: आसगाव-बार्देश येथे एका व्हिलामध्ये सुरु असलेल्या हायटेक ऑनलाईन जुगार अड्डयावर हणजूण पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच जणांना रंगेहाथ पकडून अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलसह सुमारे ५.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण पोलिसांना आसगावातील एका व्हिलामध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २१ एप्रिल रोजी पहाटे १.३० ते ३.३० च्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी संशयित आरोपी लॅपटॉपच्या मदतीने अंकीय आकड्यांवर ऑनलाईन पद्धतीने जुगार खेळत असल्याचे व खेळवत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी नवीन कुमार सोमनाथी (वय ३०, रा. हैद्राबाद, तेलंगणा), नितीन के. (वय २३, रा. पालक्काड, केरळ), अक्षय सी. (वय २६, रा. अलथूर, केरळ), संग्राम सिंह चव्हाण पाटील (वय ४०, रा. शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र) व रामकुमार एन. (वय २५, रा. मांड्या, कर्नाटक) या संशयितांना ताब्यात घेतले.

दरम्यान, या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५ मोबाईल फोन आणि ४ लॅपटॉपसह इतर साहित्य जप्त केले आहे. या सर्व साहित्याची अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. उपनिरीक्षक साईश किनळेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून या पाचही जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हणजूण पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT