arrested Dainik Gomantak
गोवा

Assagao Land Scam: 13 गुन्हे, 14 वेळा अटक! जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड 'महंमद'च्या पुन्हा आवळल्या मुसक्या

Mohammed Suhail Arrest: संशयित महंमदविरुद्ध पोलिसांत जमीन हडप प्रकरणांत १३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ९ क्राईम ब्रँचमध्ये, २ आर्थिक गुन्हे विभाग तसेच पर्वरी व म्हापशात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Sameer Panditrao

पणजी: आसगाव येथील सर्वे क्रमांक ४३/२ मधील सुमारे एक हजारांहून अधिक चौ. मी. जमिनीचे बोगस दस्तावेज तयार करून जमीन विक्रीप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड महंमद सुहेल ऊर्फ मायकल याला अटक केली.

त्याला आतापर्यंत चौदावेळा अटक करण्यात आली असून (ता. २१) त्याला मेरशी येथील न्यायालयात पोलिस कोठडीसाठी हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली.

संशयित महंमदविरुद्ध पोलिसांत जमीन हडप प्रकरणांत १३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ९ क्राईम ब्रँचमध्ये, २ आर्थिक गुन्हे विभाग तसेच पर्वरी व म्हापशात प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आसगाव येथील प्रकरणात मूळ जमीनमालकाच्या स्वाक्षरीचे बनावट दस्तावेज तयार करून जमिनीची विक्री केली होती. याप्रकरणी तपास केल्यानंतर त्याला आज अटक केली.

राज्यातील ठिकठिकाणच्या जमीन हडप प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यावर काही गोमंतकीयांनी जमिनींची पडताळणी केली असता, त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील नावे गायब असल्याचे आढळून आले होते. सरकारने अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्थापन केले होते.

परदेशस्थ गोमंतकीयांना बनविले लक्ष्य

सुहेलविरुद्ध फसवणूक व बनवेगिरीचे गुन्हे दाखल आहेत. सुहेल हा परदेशात असलेल्या गोमंतकीयांच्या तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विनावापर पडून राहिलेल्या जमिनींचा शोध घेऊन तो बनावट दस्तावेज तयार करायचा. या जमिनीचे मालक म्हणून बोगस व्यक्ती मामलेदार कार्यालयात उभ्या करून त्या जमिनी नावावर केल्यावर त्यांची विक्री करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

SCROLL FOR NEXT