Goa traffic diversion Dainik Gomantak
गोवा

Goa Road Closure: सोरो बार जंक्शन 3 दिवस बंद! आसगाव-बादे परिसरात वाहतूक वळवली; पर्यायी मार्ग कोणते?

Assagao road closed update: आसगाव-बादे परिसरात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरु असल्याने, स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली

Akshata Chhatre

Soro Bar Junction closed: आसगाव-बादे परिसरात भूमिगत वीज केबल टाकण्याचे काम सुरु असल्याने, स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. या कामामुळे आसगाव येथील सोरो बार जंक्शन (Soro Bar Junction) सोमवार (दि.१७) रात्रीपासून पुढील तीन दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. सदर परिसरात वीज केबल टाकण्याचे काम सुरु असल्याने प्रवाशांसाठी काही पर्यायी रस्त्यांची सोय करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

या जंक्शनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीपासून वाचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • हणजूण/वागातोर/आसगाव येथून शिवोली/मांद्रे येथे जाणाऱ्या प्रवाशांनी वागातोर पेट्रोल पंप रस्त्यावरून बादे या रस्त्याचा वापर करायचा आहे. तर,

  • शिवोली येथून हणजूण/कळंगूटकडे जाणारे प्रवासी मार्णा → म्हापसा → आसगाव रस्ता किंवा शिवोलीवाडो → बादे या रस्त्याचा वापर करू शकतात.

सहकार्याची विनंती

या तात्पुरत्या वाहतूक बदलादरम्यान नागरिक आणि वाहनचालकांनी सरकारी यंत्रणा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. भूमिगत केबलचे काम वेळेत पूर्ण झाल्यास, भविष्यात नागरिकांना वीज पुरवठ्यासंबंधी चांगल्या सुविधा मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Divjotsav 2025: 25-30 वर्षांपूर्वी गोव्यात चिकण मातीचेच दिवे दिसायचे, पितळीच्या दिवजांची वाढती संख्या; बदलता दिवजोत्सव

Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Cash For Job: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये शोषितांचे काय चुकले?

Child Abuse Awareness: गोव्यात एका वर्षात 202 बालकांवर अत्याचार; दुष्कृत्यांविरुद्ध लढण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज

Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

SCROLL FOR NEXT