Asphalting of road Dainik Gomantak
गोवा

गुळे ते पोळे दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू

सध्या या रस्त्याचे डांबर उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

दैनिक गोमन्तक

काणकोण: मडगाव- कारवार हमरस्त्यावरील गुळे ते पोळे या दरम्यानच्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.सध्या या रस्त्याचे डांबर उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पोळे तपासणी नाका ते दापटपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण चार महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवकाळी पाऊस झाल्याने कंत्राटदाराने डांबरीकरण थांबविले. मागणी करूनही कंत्राटदाराने डांबरीकरणाला सुरूवात केली नाही.

त्यासाठी दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रशांत नाईक, विकास भगत व अन्य कार्यकर्त्यांनी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दत्तप्रसाद कामत यांची भेट घेऊन मडगाव-कारवार हमरस्त्याच्या धर्मापूर ते पोळे पर्यंतच्या रस्त्याचे प्रलंबित डांबरीकरण सुरू करावे, अशी मागणी केली होती. या कामाची वर्कऑर्डर कंत्राटदार कोटारी यांना ऑक्टोबरमध्ये देण्यात आली होती.

त्यांना स्मरण पत्र पाठवूनही त्याने डांबरीकरण सुरू केले नसल्याचे अभियंता कामत यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यावेळी काणकोण ते बाळ्ळी पर्यंतचा रस्ता उखडला आहे.1 मार्च पूर्वी डांबरीकरण सुरू न केल्यास रास्ता रोको करू,असा इशारा जनार्दन भंडारी यांनी दिला होता.त्याप्रमाणे कंत्राटदाराने गुळे येथे मंगळवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली.यावेळी कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी,गोवा फॉरवर्डचे विकास भगत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT