Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: 'उत्तर गोवा' निबंधकांचा नाईकांना दणका! ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली

Gomantak Bhandari Samaj: ही समिती बेकायदेशीर असल्याचा निवाडा उत्तर गोवा संस्था निबंधकांनी देत संस्थेवर सरकारने प्रशासक नेमावा, असा आदेश दिला होता. आता पुन्हा ॲड. आतीष मांद्रेकर आणि ॲड. अनिश बकाल यांनी तक्रार केल्याने नव्याने प्रक्रिया करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Bhandari Samaj Elections Underway, Show-Cause Notice for Ashok Naik

पणजी: गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि समाजाच्या केंद्रीय समिती सदस्यांना उत्तर गोवा संस्था निबंधकांनी पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी ही समिती बेकायदेशीर असल्याचा निवाडा उत्तर गोवा संस्था निबंधकांनी देत संस्थेवर सरकारने प्रशासक नेमावा, असा आदेश दिला होता. आता पुन्हा ॲड. आतीष मांद्रेकर आणि ॲड. अनिश बकाल यांनी तक्रार केल्याने नव्याने प्रक्रिया करण्यात येत आहे.

उत्तर गोवा संस्था निबंधकांनी दिलेल्या निवाड्याला अशोक नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावेळी बजावलेल्या नोटीसीसंदर्भातील त्रुटी ग्राह्य मानून न्यायालयाने उत्तर गोवा संस्था निबंधकांचा निवाडा रद्दबातल ठरवला होता आणि प्रतिवाद्यांना पुन्हा दाद मागण्याची मुभा दिली होती.

त्यानुसार २० रोजी ॲड. मांद्रेकर आणि ॲड. बकाल यांनी तक्रार दाखल केली आहे. अशोक नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेवर बेकायदा कब्जा केलेला आहे. त्यांनी संस्थेचा कारभार करताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी आणि त्यासाठी हिशेब तपासनीस आणि प्रशासक नेमावा, अशी मागणी त्‍यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

दरम्यान, समाज संस्थेची निवडणूक जाहीर केली असून उमदेवारी अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे. उद्या (ता.३०) उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. समाजाचे सक्रिय सदस्य असलेल्या अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्याविषयीचा वाद निर्माण झाला आहे.

४ रोजी म्हणणे मांडण्याचा आदेश

ॲड. बकाल यांच्या तक्रारीतील आरोपांनुसार कारवाई का करू नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावून ४ नोव्हेंबरला दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश उत्तर गोवा संस्था निबंधकांनी दिला आहे. अशोक नाईक यांच्यासह दयानंद नाईक, फक्रू पणजीकर, जागुसो नाईक, अमर नाईक शिरोडकर, कृष्णकांत गोवेकर, सुनील नाईक, एकनाथ नाईक तारी, मंगलदास नाईक, आनंद तेमकर, वासुदेव विर्डीकर, रूपेश नाईक, अवधूत नाईक, प्रकाश कळंगुटकर, हनुमंत नाईक यांना या नोटिसा बजावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT