Pandharpur wari update Dainik Gomantak
गोवा

Ashadhi Wari 2025: पंढरपूर येथे लवकरच 'गोवा भवन' उभारणार; वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Bhavan Pandharpur: भाविकांना सुविधा मिळावी यासाठी पंढरपूर येथे लवकरच 'गोवा भवन' उभारले जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली

Akshata Chhatre

साखळी: आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी गोव्यातून मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात. या भाविकांना सुविधा मिळावी यासाठी पंढरपूर येथे लवकरच 'गोवा भवन' उभारले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गुरुवार (दि. १८) रोजी साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित हरिभजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

वारकऱ्यांसाठी सोयीचे ठिकाण

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, पंढरपूर येथे जाणाऱ्या गोव्यातील भाविकांसाठी 'गोवा भवन' उभारण्याचा सरकारचा मानस आहे.

यासाठी सुमारे ४ हजार चौरस मीटर (४००० चौ. मी.) जागा मिळाल्यास, सरकार लगेच हा प्रकल्प हाती घेईल. गोव्यातील वारकरी संप्रदायाची पंढरपूरच्या वारीशी असलेली जुनी आणि घट्ट परंपरा लक्षात घेऊन, गोव्याहून येणाऱ्या भाविकांना पंढरपुरात निवासाची आणि इतर आवश्यक सुविधांची सोय व्हावी, हा 'गोवा भवन' उभारण्यामागील मुख्य उद्देश आहे.

या संदर्भात आपण पंढरपूरमधील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून, ही इच्छा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अयोध्येपाठोपाठ पंढरपूरमध्येही सुविधा

गोव्यामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे आणि आषाढी वारीला विशेष महत्त्व आहे.

अयोध्येत 'गोवा भवन' उभारल्यानंतर, आता पंढरपूरमध्येही हे भवन उभारल्यास गोव्यातील वारकऱ्यांना मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

साखळी येथील रवींद्र भवनतर्फे आयोजित दिंडी आणि हरिपाठ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली, ज्यामुळे गोव्यातील वारकरी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT