Asgaon Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Asgaon: निलंबित पोलिसांची चौकशीच नाही; एसआयटी करते काय?

Asgaon House Demolition Case: मुख्य सूत्रधार पूजा शर्माला समन्स बजावण्यासाठी गोवा पोलिसांची कसरत

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर मोडतोड प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने अटक केलेल्या बाऊन्सर्सना जामीन मिळाला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची अद्याप चौकशीच केलेली नाही.

मुख्य सूत्रधार पूजा शर्माला समन्स बजावूनही पोलिसांना तिचा शोध घेण्यात यश आलेले नाही. निलंबित निरीक्षकाने महासंचालकांविरुद्ध केलेल्या आरोपांचीही शहानिशा करण्यात चालढकलपणा सुरू आहे. त्यामुळे या एसआयटीच्या तपासकामाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

हणजूण पोलिसांकडून या प्रकरणात झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी मुख्य सचिव करत आहेत. या चौकशीअंती हणजूण पोलिस निरीक्षकांसह तिघांना तडकाफडकी सेवेतून निलंबित केले होते.

हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे दिल्यावर निलंबित हणजूण निरीक्षक हे दस्तावेज सुपूर्द करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावलेले नाही. या प्रकरणातील पोलिसांची भूमिका तपासून पाहण्यासाठी आवश्‍यकता भासल्यास त्यांना बोलावण्यात येणार आहे.

जो अहवाल मुख्य सचिवांना निलंबित निरीक्षकांनी दिला आहे, तो मिळविण्यासाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत. या अधिकाऱ्यांना चौकशीस बोलावण्यापूर्वी पूजा शर्मा हिची कोठडीतील चौकशीची गरज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिंग यांची बदली लांबणीवर?

सध्या विधानसभा अधिवेशन जवळ आल्याने पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पोलिस महानिरीक्षकांना गोव्यात बोलावले असले तरी ते आठवडा उलटून गेले तरी परतलेले नाहीत.

गोवा पोलिस बजावणार तिसऱ्यांदा समन्स

जमीन खरेदी केलेल्या पूजा शर्मा हिच्यामागे सध्या पोलिसांनी ससेमिरा लावला आहे. पोलिस तिला समन्स पाठवत आहेत; मात्र ती त्याला प्रतिसाद देत नाही. तिला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यासाठी क्राईम ब्रँचच्या एसआयटीचे पथक काल मुंबईला गेले. मात्र, आजपर्यंत ते तिला बजावण्यात यश आलेले नाही. तिच्या मुंबईस्थित पत्त्यावर ती नसल्याने समन्स बजावण्यात अडचणी येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT