Health Center Dainik Gomantak
गोवा

Health Center: गावात आरोग्य केंद्र नसल्याने चिंबलवासियांची होतेय गैरसोय

आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी चिंबल ग्रामवासियांनी ग्रामसभेत केली

गोमन्तक डिजिटल टीम

आरोग्याची सुविधा हि महत्वाची असून गावातील लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी चिंबल ग्रामवासियांनी ग्रामसभेत केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी नगरपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. सध्या, गावात आरोग्य केंद्र नसल्यामुळे स्थानिकांना पणजी आरोग्य केंद्र किंवा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी जावे लागते, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले.

या संबंधी बोलताना चिंबल सरपंच संदेश शिरोडकर म्हणाले कि 'आरोग्य केंद्रासाठी पंचायतीने अनेक जागा बघितल्या होत्या. जेणेकरून भाडेतत्वावर त्याठिकाणी PHC उभारता येईल. मात्र आम्ही बघितलेल्या जागा ह्या आरोग्य अधिकार्‍यांच्या निकषात बसत नसल्याने गावात PHC उभारता येत नाहीय,' तसेच पीएचसी साठी दरमहा 17,000 रुपये भाडे असून, पंचायतीकडे निधी नसल्याने त्याचा भार कोण उचलणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला.

या प्रश्नी ग्रामस्थानीं "ग्रामपंचायतीने कर थकबाकी वसूल करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा मुद्दा उचलला. या होणाऱ्या कर वसुलीची रक्कम PHC साठी भाडे देण्यासाठी वापरले जाऊ शकते" असा सूर या सभेत निघाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT