Deployed police forces Gomantak Digital Team
गोवा

‘वेदांता’चा खनिज माल गोंधळाविना उतरविला

कोणताही तणाव नाही : कालेत दोन गटांतील वादामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे : काले येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेद्वारे आणलेल्या वेदांता गोवा कंपनीच्या खनिज मालाची उचल करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून काले गावात दोन गटांत तेढ निर्माण झाली होती; पण अखेर मंगळवारी (ता.30) चित्रदुर्ग-कर्नाटकमधून रेल्वेमार्गे आलेला खनिज माल संध्याकाळी 7 वाजता काले रेल्वे स्थानकावर कोणत्याही गोंधळाशिवाय खाली करण्यात आला.

खनिज वाहतुकीवरून काले भागात दोन गटांत वाद उफाळून येत होता. खनिज भरलेली रेल्वे येणार आणि दुसरा गट विरोध करणार या हेतूने कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी काले रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा दिवसभर तैनात करण्यात आला होता. अवघेच लोक ठरावीक कंत्राटदाराला वेदांता कंपनीने कंत्राट देऊ नये यासाठीच काले गावात मिळणाऱ्या रोजगाराला विरोध करतात, असे किशोर देसाई म्हणाले.

चेहऱ्यावर हास्य उमटले

सकाळी अकरा वाजता येणारी मालवाहू गाडी संध्याकाळी ७ वाजता काले रेल्वे स्थानकावर दाखल होताच विलास देसाईंसोबत तेथे उपस्थित असलेल्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून दिवसभर दोनशेपेक्षा अधिक पोलिस बंदोबस्तासाठी ताटकळत उभे होते. पण दुसऱ्या गटाकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही.

खनिज वाहतूक करण्यासाठी वेदांता कंपनी किंवा रेल्वेकडून स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे ग्रामसभेत पंचायतीला विश्वासात न घेतल्यास पुढील पाऊल उचलण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखण्याचे आपले काम नसून जे काही करायचे ते कायदेशीर मार्गाने केले जाईल.

- नरेंद्र गावकर, सरपंच, काले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT