Milind Naik Dainik gomantak
गोवा

मिलिंद नाईकांना उमेदवारी जाहीर होताच मुरगाव वासीयांत जल्लोष

मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते मुरगावचे नगरसेवक नाईक यांच्या समवेत उपस्थित होते

दैनिक गोमन्तक

मुरगाव मतदार संघात भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आमदार मिलिंद सगुण नाईक यांना जाहीर होताच मुरगाव वासीयांत जल्लोष. मिलिंद नाईक यांनी भाजपची उमेदवारी जाहीर होताच देव दर्शनाने प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते मुरगावचे नगरसेवक नाईक यांच्या समवेत उपस्थित होते.

गोवा (Goa) भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवार दि. 20 रोजी 36 मतदारसंघातील उमेदवारी यादी जाहीर केली. यात मुरगाव तालुक्यातील दाबोळी, वास्को, बरोबर मुरगावची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मुरगावतून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मिलिंद नाईक, दाबोळीतून पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोतून माजी नगरसेवक कृष्णा साळकर यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. मुरगावतून भाजपच्या उमेदवारीवर हॅट्ट्रिक साधणारे मिलिंद नाईक यांना चौथ्यांदा उमेदवारी घोषित करताच मुरगावात आनंद साजरा करण्यात आला.

गोवा (goa) प्रदेश काँग्रेसतर्फे अनेक प्रकारे बिनबुडाचे आरोप आमदार (MLA) मिलिंद नाईकवर करण्यात आले होते. या सर्व आरोपातून मुक्त होताच राज्य भाजप कार्यकारिणीने मुरगावतून मिलिंद नाईक यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर केली. भाजपची उमेदवारी मिळताच मिलिंद नाईक यांनी सडा भागातील श्री ईश्वरी ब्राह्मण लक्ष्मीनारायण, जेटी हनुमान मंदिर, सडा हनुमान मंदिर, श्री राष्ट्रोळी दामोदर मंदीर हरबर, साईबाबा मंदीर सडा, बोगदा गणपती मंदिर, श्री कलम देव खाप्रेश्वर देवस्थान सडा, बायणा हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, खाप्रेश्वर मंदिर सासमोळे, बायणा येथील गणपती मंदिर, बायणा येथील राम भक्त हनुमान मंदिरा बरोबर वास्कोचे ग्रामदैवत दमोदराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक दामू नाईक, दयानंद नाईक, रामचंद्र कामत, लिओ रोड्रिक्स, प्रजय मयेकर, माजी नगरसेवक नगरसेवक मुरारी बांदेकर, कृष्णा तोरस्कर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT