Hindu Organizations
Hindu Organizations Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आगमन होताच दीदींना दाखवले हिंदू संघटनांनी काळे झेंडे

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे आज गुरूवार 28 ऑक्टोबर रोजी गोव्यात संध्याकाळी पावणेसहा वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले. तृणमूलचे लुईझीन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी बॅनर्जी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत लवू मामलेदार, सांगेचे प्रसाद गावकर उपस्थित होते. यावेळी दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विमानतळा बाहेर येताच त्यांनी नमस्कार केला व सरळ गाडीत जाऊन बसल्या व निघून गेल्या. यावेळी विमानतळा बाहेर पश्चिम बंगाल येथील सेक्युरीटी ताफा मोठ्या प्रमाणात होता. याव्यतिरीक्त तृणमूल काँग्रेसचा एकही कार्यकर्ता नव्हता. तीन दिवस त्या गोव्यात असतील. या तीन दिवसांत अन्य पक्षातील काही आमदार तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच राजकीय उलथापालथी पहायला मिळणार आहेत.

ममता यापूर्वी कधीच गोव्यात आलेल्या नाहीत. त्या प्रथमच गोव्यात दाखल झाल्या. तृणमलच्या एकूणच सगळ्या घडामोडींनंतर ममता बॅनर्जी यांची ही पहिलीच गोवा व्हिजिट आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या या पहिल्या वाहिल्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूलकडूनही जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान ममता बॅनर्जीच्या या दौऱ्या दरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता होती ती खरी ठरली. त्यानुसार आज दाबोळी विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जीच्या निषेधार्थ परशुराम सेना, हिंदू वाहिनी सेना, भगवा हिंदू सेना, बजरंग दल, राष्ट्रीय बजरंग दल,समर्थ गडाचे हिंदूत्व, तसेच इतर वेगवेगळ्या संघटनेच्या हिंदूंनी एकवटून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी काही मोजकेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांना विमानतळ आवारात प्रवेश देण्यात आला नाही.त्यांनी मुख्य रस्त्यावर उभे राहून हातात काळे झेंडे तसेच निषेध फलक घेऊन नारेबाजी करीत निषेध व्यक्त केला.यावेळी पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांनी आपण गोव्यात येत असल्याचं यापुर्वीच स्पष्ट केलं होतं. यावेळी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं.नव्या आघाडीतून नवी सकाळ उजाडण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान वादग्रस्त कार्टूनचे कारण पुढे करून दाबोळीतील ठिकठिकाणचे तृणमूलचे बॅनर्स फाडून टाकले. ममता बॅनर्जी यांच्या फलकांना काळं फासलं. गुरूवारी त्यांचं आगमन होणार असल्याने त्यानिमित्तानं ठिकठिकाणी जय श्री राम च्या मंत्रोच्चाराचे फलक लावून अनोख्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांनी सोशल मिडियावर जय श्री राम नामक मोहीमच सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT