Calangute Crime News Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : गोव्यात चोरी झालेल्या आणखी 4 दुचाकी कोल्हापूरातून जप्त

याप्रकरणी कोल्हापूरमधून दोघांना अटक करण्यात आली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : गोव्यातून भाडेपट्टीवरील वाहने खोटी ओळखपत्रे सादर करून ती चोरणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी कळंगुट पोलिसांनी पदार्फाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरमधून संजय कलके (करवीर-कोल्हापूर) व सद्दाम जमादार (उचगाव-कोल्हापूर) या संशयितांना अटक केली. तसेच संशयितांकडून 5 दुचाक्यासह 1 चारचाकी असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

दरम्यान पोलिसांनी संशयितांची अधिक चौकशी केली असता आणखी 4 दुचाकी गोव्यातून आणल्याचे उघड झाले. आज पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयितांनी बागा, कळंगुटमधून अ‍ॅक्टिव्हा स्कूटर व मारुती कार रेंटवर घेतली. मात्र, त्यांनी वाहने परत केली नाहीत. त्यांनी खोटे ओळखपत्र सादर केले होते. संशयित वारंवार आपली ठिकाणे बदल होते.

पोलिसांनी या उपलब्ध मोबाईल क्रमांक व वारंवार तांत्रिक पाळत ठेवत संशयितांचा माग काढला. पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्यांनी गोव्यातून 4 वाहने अशाच पद्धतीने चोरुन आणली होती.

कोल्हापूरमध्ये सुद्धा ते कर्जावर घेतलेल्या वाहनांची ओळख पटवून अशाप्रकारे वाहनांची विल्हेवाट लावायचे. संशयितांची अधिक चौकशी केली असता आणखी 4 दुचाकी गोव्यातून आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amba Ghat Landslide: संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

Goa Today Live News: 'पक्ष आणि राज्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, गोविंद गावडे अजूनही माझे मित्र'; प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT