Goa BJP Dainik Gomantak
गोवा

भाजपकडून यंदा तब्बल 12 कॅथलिक उमेदवार रिंगणात

कॅथलिक समाजाला उमेदवारीत 30 टक्के प्रतिनिधित्व

दैनिक गोमन्तक

Goa BJP: भाजपा हा पक्ष जरी स्वतःच्या खांद्यावर हिंदुत्वाची पताका मिरवत असला तरी राज्यात या पक्षाने यंदा तब्बल 12 ख्रिश्चन उमेदवार उभे केले आहेत. भाजपच्या (BJP) इतिहासात हे प्रथमच घडत असून पहिल्यांदाच कॅथलिक समाजाला उमेदवारीत 30 टक्के प्रतिनिधित्व प्राप्त झाले आहे.

गोव्यात अजूनही कॅथलिक मतदारांसाठी भाजप (BJP) हा उपरा पक्ष असतानाही 2012 मध्ये भाजपने 6 कॅथलिक उमेदवार उभे केले होते. 2017 मध्ये ही संख्या सातवर पोहोचली होती. भाजपने गोव्यात सुमारे 3.5 लाख सदस्य नोंदणी केलेली असून त्यापैकी 18 टक्के ख्रिश्चन सदस्य आहेत. गोव्यात हिंदू मतदारांची टक्केवारी 66 टक्के असून कॅथलिक मतदारांचा टक्का 25 वर पोहोचला आहे. गोव्यात 8 टक्के मतदार मुस्लिम आहेत.

भाजप धर्मांध किंवा अल्पसंख्याक विरोधी पक्ष,असा जो गोव्यात अपप्रचार विरोधकांनी चालविला आहे, त्याला हे आमचे उत्तर आहे. भाजप हा अल्पसंख्याक विरोधी नाही, हे आम्ही कृतीतून दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी व्यक्त केली.

सासष्टी तालुक्यातही भाजपने 3 ख्रिश्चन उमेदवारांना रिंगणात उतरविले असून कुडतरीत अँथनी बार्बोजा, कुंकळ्ळीत क्लाफास डायस तर वेळ्ळीत त्यांनी सावियो रॉड्रिग्स याना उमेदवारी दिली आहे. सासष्टीतही आमची ताकद आता वाढत चालली असून आता आम्हाला येथे ''मिशन सालसेत'' राबविण्याची गरज राहिलेली नाही, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केले आहे.

हे आहेत ख्रिश्चन उमेदवार

ग्लेन टिकलो (हळदोणे), ज्योसुआ डिसोझा (म्हापसा), जोसेफ सिक्वेरा (कळंगुट), बाबुश मोन्सरात (पणजी), जेनिफर मोन्सरात (ताळगाव), टोनी फेर्नांडिस (सांता क्रूझ), ॲंथनी बार्बोजा (कुडतरी), फ्रान्सिस सिल्व्हेरा (सांत आंद्रे), माविन गुदिन्हो (दाबोळी), क्लाफास डायस (कुंकळ्ळी), सावियो रॉड्रिग्स (वेळ्ळी), निलेश काब्राल (कुडचडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT