डिचोलीत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; मतदारांत तीव्र पडसाद

मेणकुरेत भाजप नेत्यांना करावा लागला रोषाचा सामना
Goa BJP : Bicholim constituency
Goa BJP : Bicholim constituencyDainik Gomantak

Bicholim constituency: डिचोली मतदारसंघाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या नेतृत्त्वाचे दुर्लक्ष झाल्याची भावना मतदारांत तीव्र आहे. रोजगारासह विविध प्रश्‍न सोडवण्यात नेत्यांना अपयश आल्याचा प्रत्ययही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि भाजपच्या काही नेत्यांना नुकताच आला. डिचोली मतदारसंघातील (Bicholim constituency) मेणकुरे या गावात आलेला कटू अनुभव एका म्यानात दोन तलवारी ठेवायच्या नसतात, याचा प्रत्यय भाजप नेत्यांना देऊन गेला. सरकारी नोकऱ्या केवळ आपल्याच मतदारसंघात वाटायच्या खाशा स्वाऱ्यांच्या आप्पलपोटेपणावर आता नसला तरी भविष्यात उपाय शोधायलाच हवा, याचीही जाणीव या घटनेने नेतेमंडळीना करून दिलेली आहे.

Goa BJP : Bicholim constituency
दिवंगतांच्या नावांवर मतांसाठी जोगवा! खरी कुजबुज

मेणकुरे येथे प्रचारासाठी आलेल्या नेत्यांकडे भाजप (BJP) महिला मोर्चाच्या नेत्या आणि उमेदवारीसाठीच्या इच्छुक शिल्पा नाईक यांची समजूत घालून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचेही काम होते. मात्र मुख्यमंत्री येत असल्याची आगाऊ सूचना मिळालेले काही स्थानिक दबा धरून होते. त्यांना भाजपाच्या वाहनांचा ताफा दिसताच मोठमोठ्याने आवाज करत हुर्यो उडवण्यास सुरुवात केली. पोलिसांचे एस्कॉर्ट असल्याने मुख्यमंत्र्यांचे वाहन पुढे निघून गेले पण उमेदवार राजेश पाटणेकर यांचे काका कांता पाटणेकर यांचे वाहन अडवून काहींनी अशिष्ट शब्दांत त्यांच्याशी वाद घालण्याचा यत्न केला. या घटनेचे काहीजणांनी मोबाईलवरून चित्रीकरण करून ते लगेच सोशल मीडियावरही अपलोड केले. एकंदर पाहता हा पूर्वनियोजित प्रतिसाद असल्याचे स्पष्ट दिसत होते.

Goa BJP : Bicholim constituency
प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही: लोबो

सावंत सरकारच्या काळातल्या सरकारी नोकऱ्यांत डिचोली मतदारसंघावर अन्याय झाल्याची भावना अनेक ठिकाणी तरुण मतदारांच्या नाराजीत उमटताना दिसली.

मेणकुरे गावातली पक्षाची पारंपरिक मते पक्षाला मिळतील ,असा विश्वास भाजपला वाटतो. या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे नरेश सावळ आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये हे दोघेही मेणकुरे गावचेच असल्याने येथील मतदान तिन्ही दिशांनी विभागून जाईल.

डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. साळ, लाटंबार्से, मुळगाव पंचायतक्षेत्रात हा मतदार आहे. याआधी यातली बरीच मते नरेश सावळ यांना मिळायची. आता डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि कॉंग्रेसचे मेघश्याम राऊतही या मतदारांवर लक्ष केंद्रीत करताना दिसतात. नरेश सावळ यांना आपली ग्रामीण मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी शर्थ करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com