Aryan Singh Dadiala, Goa swimming, open sea swim Dainik Gomantak
गोवा

'तूफ़ान समुंदर के न दरिया के भँवर देख'! 19 तास, 94 किलोमीटर अंतर! प्रतिकूल हवामानात 'आर्यन'ने पार केला गोव्याचा समुद्र

Aryan Singh Dadiala Swimming: प्रतिकूल हवामान आणि सभोवती जेलीफिशने भरलेले पाणी तरीही आर्यन सिंग दादीयाला यांनी चिकाटीने गोव्यातील समुद्रात विविध टप्प्यातील आपले पोहणे पूर्ण केले.

Sameer Panditrao

प्रतिकूल हवामान आणि सभोवती जेलीफिशने भरलेले पाणी तरीही आर्यन सिंग दादीयाला यांनी चिकाटीने गोव्यातील समुद्रात विविध टप्प्यातील आपले पोहणे पूर्ण केले.

त्यांच्या उपक्रमातील टप्पे पुढीलप्रमाणे होते: 

वागातोर  ते करंजाळे समुद्रकिनारा

(23 किलोमीटर) 13 ऑक्टोबर 

कुठ्ठाळी जेटी  ते रेईस मागोस जेटी

(25 किलोमीटर) 15 ऑक्टोबर 

रेईस मागोस जेटी ते शापोरा किल्ला

(22 किलोमीटर) 17 ऑक्टोबर 

बेतुल ते आरोशी समुद्रकिनारा

(24 किलोमीटर) 19 ऑक्टोबर 

समुद्राच्या खुल्या पाण्यात, विविध टप्प्यातील एकूण 94 किलोमीटरचे अंतर पोहण्यासाठी  आर्यनने एकूण 19 तास 13 मिनिटे घेतली.  त्याचे प्रशिक्षक डॉ. मोहन रेड्डी यांच्या सखोल प्रशिक्षणामुळे आर्यनला हे यश मिळवणे शक्य झाले. मोहन रेड्डी यांनी लांब पल्ल्याचे अंतर गाठण्यासाठी आवश्यक असलेली सहनशक्ती आणि ऊर्जा आर्यनमध्ये निर्माण करण्यास हातभार लावला.

स्वच्छ समुद्रकिनारे, स्फटिकासारखे पाणी, उच्च संस्कृती, वारसा, विविध महोत्सव आणि गोव्यातील प्रेमळ लोक यांना आर्यनने आपले यश समर्पित केले आहे. आर्यनच्या या मोहीमेसाठी गोवा जलतरण संघटना, राष्ट्रीय जलक्रीडा संस्था, दोनापावला आणि ‘दृष्टी’ने विशेष सहकार्य केले. खुल्या समुद्रातील आघाडीचा जलतरणपटू म्हणून आर्यनची ओळख असून त्याच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डही आहे.

गोव्याच्या खुल्या समुद्रात पोहायला मला खूप आवडते. येथील स्वच्छ पाणी, निसर्ग हा आपलेसे करुन घेतो. त्यामुळे गोव्याची ही खरी ओळख जपली जावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे ‘स्वच्छ, सुंदर बीच जपूया’ असा संदेश मी माझ्या या मोहीमेतून दिला आहे. या उपक्रमाला मला मिळालेल्या सहाय्यामुळे मी गोवा सरकारचा खूप आभारी आहे.

- आर्यन सिंग दादीयाला,आंतरराष्ट्रीय जलतरणपटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

Child Summer Care: सावधान! उन्हाचा कडाका वाढतोय; तुमच्या चिमुरड्यांना उष्माघातापासून 'असे' वाचवा

गोव्यातील व्यक्तीकडून बेळगावात चोरी, 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 160 ग्रॅम दागिने ताब्यात

Strait Of Hormuz Tension: "होर्मुज नाकेबंदीजवळ आलात तर समुद्रातच गाडून टाकू!" ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; अमेरिकन नौदलाला 'शूट टू किल'चे आदेश

SCROLL FOR NEXT