दाबोळी विमानतळावर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करताना आपचे बाबू नानोस्कर,प्रतिमा कुतिन्हो सोबत इतर.
दाबोळी विमानतळावर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करताना आपचे बाबू नानोस्कर,प्रतिमा कुतिन्हो सोबत इतर. Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवाल यांचा गोव्यात तिसरा दौरा

दैनिक गोमन्तक

दाबोळी: आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही आज गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. केजरीवाल यांनी काल 31 ऑक्टोबर रोजी एका ट्विटद्वारे आपण गोव्यात येत असल्याचे तडकाफडकीचा संदेश पाठवला होता. यापूर्वी केजरीवाल दोन वेळा राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आजचा हा राज्यातील त्यांचा तिसरा दौरा आहे.

या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी, आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे यांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ देवाच्या आशीर्वादानेच आपल्याला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळते. मी माझ्या गोव्यातील बांधवांशी बोलण्यासाठी उद्या गोव्यात येईन असे ट्विट त्यांनी केले होते. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यापूर्वी गोव्यात येऊन गोवेकरांना मोफत वीज आणि नोकरीची हमी दिली आहे. आपचे कार्यकर्ते सध्या गोव्यात दिवसाला 75 बूथ सभा आणि दिवसातून 2 रॅली घेऊन येत्या गोवा विधानसबा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. गेला महिनाभर अशा सभांद्वारे आप निवडणुकीची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. आपने आतापर्यंत 1700 बूथ सभा घेतल्या आणि 1,12,056 लोकांनी आपच्या रोजगार हमी कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच 2 ,50 ,000 गोवेकरांपर्यंत ही यात्रा पोहोचली आहे. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आपमध्ये दयानंद नार्वेकर, बाबू नानोस्कर, सत्यविजय नाईक, राजदीप नाईक, गणपत गावकर,डॉमिनिक गावकर, रितेश चोडणकर आणि अमित पालेकर यांसारख्या नेत्यांनी अलीकडेच प्रवेश केल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे. पक्षाने आणि पक्षाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे पक्षाने खऱ्या अर्थाने गोव्यातील मतदारांना सक्षम केले आहे अशी माहितीही आप कार्यकर्त्यांनी दिली.अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गोवा दौऱ्यावर असताना राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक तरुणाला रोजगार देण्याची हमी जाहीर केली होती. तसेच जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक तरुणाला रोजगार आणि दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आजच्या गोवा दौऱ्यात केजरीवाल हे गोव्यातील पक्षाचे नेते व विविध मतदारसंघातील प्रमुख यांच्या भेटी घेऊन येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. पणजीत त्यांची पत्रकार परिषदही होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Devi Jatra 2024 : श्री लईराई देवीच्या दर्शनासाठी शिरगावात गर्दी

Lairai Devi Jatra 2024 : शिरगावात ‘गोबी’ला बंदी; मात्र अस्नोड्यात थाटले स्टॉल्‍स

Crime News : शिकारीचा नाद भोवला; कदंबचे १६ कर्मचारी अटकेत

OCI Card Issue : ओसीआय कार्डप्रकरणी भाजपने फसविले : युरी आलेमाव

Goa Police : गोवा पोलिसांची विश्वासार्हता वेशीवर; पोलिसानेच पुरवली गुन्हेगारांना माहिती

SCROLL FOR NEXT