Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: मांद्रेचे हरमलकरबंधू जपताहेत 100 वर्षांचा वारसा

Goa Ganesh Chaturthi 2023: कलेसाठी व्‍यवसाय : कलाकार आर्थिक संकटात; सरकारने अनुदानाची रक्कम वेळेत देणे गरजेचे

दैनिक गोमन्तक

Goa Ganesh Chaturthi 2023: देऊळवाडा-मांद्रे येथील परशुराम आर्टस्‌चे युवा कलाकार विनोद व संदेश परशुराम हरमलकर हे बंधू चिकणमातीपासून गणेशमूर्ती बनविण्‍यात तरबेज आहेत. त्‍यांनी ही कला आजोबा व वडिलांकडून शिकली असून त्‍यास सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. मात्र फायद्याची वजाबाकी खूपच तोकडी असते.

मूर्तींना लागणारी चिकणमाती ते रंगांची मेळ घालणे कठीण झाले आहे. मात्र कला म्‍हणून हा व्यवसाय जपल्याचे संदेश हरमलकर सांगतात. राज्यातील मूर्तिकारांना सरकार अनुदान देत असल्याने त्‍यांना मदतीचा हात मिळतो. मात्र आवश्यक सोपस्कार करूनही अनुदान उशिराने जमा होत असल्याने आर्थिक स्थिती कोलमडून जाते. पैशांसाठी व्यावसायिक तगादा लावतात. अनुदानाची रक्कम लवकर जमा झाल्यास देणी फेडता येतात, असे संदेश हरमलकर यांनी सांगितले.

कोल्‍हापूर येथून मागणी

दरवर्षी साधारणत: दीडशे गणेशमूर्ती चित्रशाळेत बनविल्या जातात. मडगाव, जुने गोवे, बार्देश व पेडणे तालुक्यासह अन्य भागांतही या मूर्ती पोचविल्या जातात. यंदा तर एक मूर्ती चक्क कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. त्या गणेशभक्ताला मूर्ती आवडण्याचे कारण म्हणजे मूर्तीची सुबकता होय. कित्येक मूर्ती हाताने घडविल्या जातात. त्यामुळे मूर्तीची छटा, नक्षीकाम, उठावदार रंगकाम केल्यानंतर प्रसन्न भासणारी मूर्ती म्हणजे साक्षात कलाकाराची सत्त्वपरीक्षा असते, असे संदेश हरमलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT