P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Article 370 Movie : ‘आर्टिकल ३७०’ सिनेमा राष्ट्रीय अखंडतेला चालना देणारा : राज्यपाल पिल्लई

Article 370 Movie : राजभवनातील कर्मचाऱ्यांसह सिनेमागृहात पाहिला चित्रपट

गोमन्तक डिजिटल टीम

Article 370 Movie :

पणजी, राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी बुधवारी पणजीतील आयनॉक्स सिनेमागृहात राजभवन कर्मचाऱ्यांसह आर्टिकल ३७० चित्रपट पाहिला.

हा चित्रपट राष्ट्रीय अखंडतेला चालना देतो असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचेही कौतुक केले.

बुधवारी दुपारी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आणि त्यांच्या पत्नी तसेच राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आयनॉक्स सिनेमा हॉलमध्ये ‘आर्टिकल ३७०’ चे खासगी स्क्रीनिंग होते. या खासगी स्क्रीनिंगवेळी प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधीही उपस्थित होते.

राज्यपाल पिल्लई यांनी पुढे नमूद केले की माझा ‘राष्ट्र प्रथम’या कल्पनेवर विश्वास आहे आणि धर्म, राजकारण इत्यादी गोष्टी नंतर येतात.

आर्टिकल ३७० ही भारताच्या राज्यघटनेतील तात्पुरती घटना होती. परंतु ती दीर्घ काळासाठी सुरू होती. भारतीय संविधानातून हे कलम ३७० हटवण्याचे धाडस विद्यमान सरकारने दाखविले.

ते पुढे म्हणाले की, जेव्हा हे कलम हटविले गेले, तेव्हा सर्वांना वाटले होते की दंगली, निदर्शने वगैरे होतील; पण भारतातील जनतेने शांततेने सरकारचा हा निर्णय मान्य केला.

दिग्दर्शक जांभळे यांचे कौतुक : राज्यपाल पिल्लई यांनी ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हा चित्रपट राष्ट्रीय अखंडतेच्या कल्पनेला चालना देतो. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचे कौतुक केले, जे मूळ गोव्याचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT