Goa Culture |
Goa Culture | Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: सत्तरीत श्रमदानातून साकारला जातोय रंगमंच

दैनिक गोमन्तक

Goa Culture: ‘गाव करील, ते राव काय करील’, अशी म्हण आहे. त्याला अनुसरून उस्ते-सत्तरीतील श्री साई कला व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कलागुणांच्या सादरीकरणासाठी अहोरात्र परिश्रम करत श्रमदानातून भव्य रंगमंच उभारण्याचा संकल्प केला आहे. गावातील सर्वच मंडळी त्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम करत आहेत.

सत्तरी तालुका ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जाते. त्यात धालो, फुगडी, रणमाले व इतर कलांची मांदियाळी आहे. मात्र, कला सादर करण्यासाठी कलाकारांना व्यासपीठाची आवश्यकता असते.

गेली 20 वर्षे हे मंडळ गावात व गावाबाहेरही कलागुण साकारत रणमाले ही कला सातत्याने जोपासत आले आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर आहेत.

2007 साली स्थापन केलेल्या या मंडळाने संस्थेची पक्की इमारत बांधून ओळख निर्माण केली. त्यासाठी आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह पंचसदस्य रामू खरवत, रमेश जोशी, प्रेमनाथ हजारे, उल्हास गावकर व ग्रामस्थांचे योगदान लाभले.

गावपण टिकवण्यासाठी कटिबद्ध

संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गावकर म्हणाले की, उस्ते गावाने अनेक लोककला जोपासल्या आहेत. गावातील लोकांना कला सादर करण्यासाठी हक्काची जागा नव्हती. म्हणून ही संस्था स्थापन केली. सध्या इमारत बांधून पूर्ण झाली आहे.

लवकरच व्यासपीठ बांधून पूर्ण होईल. स्थानिकांना विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी ही वास्तू उपयुक्त आहे. गावपण टिकवून ठेवण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे, असे गावकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT