Goa Art Festival  Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत 30, 31 मार्च रोजी ‘कला महोत्सव’

मांद्रेच्या प्रांगणात दोन दिवसीय ''कला महोत्सव'' आयोजित करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: स्वरगंधा मांद्रे आणि कला व संस्कृती संचालनालय, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 30 व 31 मार्च 2022 रोजी श्री सातेरी देवस्थान मराठ वाडा, मांद्रेच्या प्रांगणात दोन दिवसीय ''कला महोत्सव'' आयोजित करण्यात आला आहे.

30 रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या उद्‍घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार व्ही. जी. शेटगांवकर तसेच राष्ट्रीय कीर्तनकार सुहासबुवा वझे, मांद्रे सरपंच प्रिया कोनाडकर, पंच सदस्य सुभाष आसोलकर, स्वरगंधा अध्यक्षा व माजी कला आणि संस्कृती मंत्री संगीता परब, स्वरगंधा उपाध्यक्ष प्रदीप हरमलकर, सचिव सोमनाथ पार्सेकर व सातेरी देवस्थानचे अध्यक्ष मकरंद पार्सेकर उपस्थित रहाणार आहेत. यावेळी होणाऱ्या सत्कार व गुणगौरव सोहळ्यात नाट्य कलाकार नीळकंठ मठकर, दादू पार्सेकर, संतोष सावंत, कु. अनघा आजगावकर तसेच पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सायंकाळी 5:30 वाजता गोव्यातील उभरत्या बाल व युवा कीर्तनकारांचा "कीर्तन महोत्सव"आयोजित करण्यात आला आहे. देव,देश, धर्म आणि भारतीय संस्कृतीचे रक्षण असे या कीर्तन महोत्सवाचे स्वरूप असून त्यामध्ये ह.भ.प शिवानी वझे, चिन्मयी कामत, सिद्धी पार्सेकर, सना साटेलकर, ब्रह्मय सुर्लकर आणि सर्वेश साळगांवकर विविध विषयावर किर्तने सादर करणार आहेत.

31 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. स्वरगंधा मांद्रे प्रस्तुत सं. "संशय कल्लोळ" नाटक होणार आहे. दिग्दर्शन प्रशांत मांद्रेकर यांचे असून भक्ती धुपकर, सिद्धी पार्सेकर,मृण्मयी मांद्रेकर, कनक कोनाडकर, वैष्णवी मेथर, सोनम गोडकर, अर्चिता आरोसकर भूमिका साकारणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT