काणकोण: गोव्यात नव्याने निवडून आलेल्या चाळीसही आमदारांनी जागतिक ग्राहक दिनी म्हणजे 15 मार्चला कार्यतप्तरता,गोपनियता, व सार्वभौमत्व याची भारतीय घटनेला स्मरून शपथ घेतली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यास ते कटिबद्ध असल्याचे गोवा कॅनचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी आज काणकोण येथे ग्राहक कायदा,ग्राहकांचे हक्क, अधिकार या विषयी बोलताना सांगितले.
श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या ग्राहक कक्षाने गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लीक ॲडमिनिस्ट्रेशन ॲन्ड रूरल डेव्हलपमेंट संस्थेच्या सहकार्याने शनिवारी महाविद्यालयात मार्टिन्स संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्राहकांना वस्तूची माहिती मिळविण्याचा व वस्तूच्या निवडीचा पूर्ण अधिकार आहे आहे.मात्र निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या वस्तूचा जीवनात वापर करणे ग्राहक म्हणून त्याची तेवढीच जबाबदारी आहे.आता महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाबरोबरच शेजाऱ्यांनाही ग्राहक हक्क व कर्तव्याविषयी जागरूक करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी पत्रकार सुभाष महाले,महाविद्यालयाच्या ग्राहक सेलचे प्रमुख सहाय्यक प्राध्यापक केवल नाईक, उत्कर्ष पागी, डॉ.रूपा च्यारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्कर्ष पागी यांनी केले. डॉ.च्यारी यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.