Ratan Tata art exhibition in Patto Goa
पद्मविभूषण रतन टाटा यांना कलात्मक पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी माशेल येथील सम्राट क्लबने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी ‘कलारतन’ हे विशेष कलासत्र आयोजित केले होते. या सत्रात कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमातून रतन टाटा यांच्या जीवांनावर आधारित कलाकृती निर्माण केल्या होत्या.
मोझॅक आर्ट, कॅनव्हास, चारकोल, वॉटर कलर, कोलाज, ग्राफिक डिजिटल आर्ट, पिक्सल, क्ले, म्युरल, पेन्सिल ड्रॉईंग अशा विविध माध्यमांतून काम करून रतन टाटा यांचे व्यक्तीमत्व कलाकृतीत साकार करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला. या कलाकृतींचे प्रदर्शनही कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोव्यातील 15 कलाकारांनी भाग घेतला होता.
'कलारतन' मध्ये निर्माण झालेल्या तसेच त्यानंतर त्यातील कलाकारांनी पुढील काळात निर्माण केलेल्या रतन टाटा यांच्यावर आधारित 45 कलाकृतींचे प्रदर्शन 6 ते 8 डिसेंबर या काळात पाटो येथील संस्कृती भवनमधील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या कलादालनात भरणार आहे. वयाच्या 26 व्या वर्षी निधन पावलेले उद्योगमहर्षी रतन टाटा यांना आदरांजली म्हणून 9 ऑक्टोबर 2024 रोजी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रतन टाटा भारताच्या औद्योगिक क्रांतीचे नेते होते. भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण या भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनादरम्यान अनुज शेठ नार्वेकर यांच्या देखरेखीखाली रेखांकन, चित्रकला, शिल्पकला, माती काम, जलरंग, ग्राफिक प्रिंट, व्यंगचित्र, कॅलिग्राफी, कविता, ओरिगामी, कोलाज, ग्राफिटी आणि रांगोळी कला या माध्यमातील कलासत्रे देखील आयोजित केली जाणार आहेत.
6 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
7 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता अनुज शेठ नार्वेकर यांचे लाईव्ह पेंटिंग तसेच संकेत लवंदे यांचे लाईव्ह कॅरिकेचर पेंटिंग सत्र असेल.
8 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता प्रभव गावकर हे शिल्पकलेचे तर चित्रकार समीर नाईक हे जलरंग चित्रांचे प्रात्यक्षिक देतील
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.