Divjotsav: दिवजांच्या प्रकाशाने उजळली मंदिरे! भजन, पालखी, गाऱ्हाणी सादर; पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा

Divjotsav In Goa: तालुक्यातील विविध भागांत कार्तिक अमावास्येनिमित्त पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो सुवासिनींनी साजशृंगार करून दिवजोत्सवाचा आनंद घेतला.
Divjotsav In Goa 2024
DivjotsavDainik Gomantak
Published on
Updated on

Divjotsav In Goa 2024

डिचोली: तालुक्यातील विविध भागांत कार्तिक अमावास्येनिमित्त पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा करण्यात आला. शेकडो सुवासिनींनी साजशृंगार करून दिवजोत्सवाचा आनंद घेतला.

गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा देवीचा दिवजोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी चार चौगुले ग्रामस्थ गावकरांकडून देवीच्या कळसाला अभिषेक आदी विधी पार पडले. आरती व गाऱ्हाणे झाल्यानंतर देवीचा कळस वाजतगाजत बाराजण येथे नेला.

बाराजण येथे कळसाची विधिवत पूजा आणि गाऱ्हाणे घातल्यानंतर देवीच्या कळसाचे परत मंदिरात आगमन झाले. दीपस्तंभ पूजा आदी कार्यक्रम झाल्यानंतर दीप ओवाळणी झाली. सुवासिनींनी पेटती दिवजे डोक्यावर घेऊन श्री शांतादुर्गा आणि रवळनाथ मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली.

सर्वणच्या दिवजोत्सवाची खासियत

सर्वण येथील श्री कुळमाया सातेरी श्यामपुरुष देवस्थानचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्ध दिवजोत्सव रविवारी (ता. १ डिसेंबर) पहाटे साजरा झाला. गावातील सुवासिनींच्या आनंदाला उधाण आणणारा आणि पहाटे साजरा होत असल्याने सर्वण येथील दिवजोत्सव बराच प्रसिद्ध आहे. दिवजोत्सवाच्या पूर्वरात्री भजन आदी विधी झाल्यानंतर श्री कुळमाया देवीच्या कळसाचे वाजतगाजत श्री सातेरी मंदिरात आगमन झाले. मध्यरात्री पारंपरिक विधीनंतर रविवारी पहाटे दिवजोत्सवाला सुरवात झाली.

Divjotsav In Goa 2024
Dhendlo Utsav: ‘दे धेंडलो, धेंडल्यान पावस शेणलो’! लोकगीतांच्या गजरात गोव्यात 'धेंडलो उत्सव' साजरा

उत्सवासाठी नवविवाहितांचे आगमन

सर्वणमध्ये स्थानिक सुवासिनींतर्फे सर्वप्रथम श्री कुळमाया मंदिरात दीप ओवाळणी करण्यात आली. नंतर श्री सातेरी आणि श्री श्यामपुरुष मंदिरात दीप ओवाळणी केली. दिवसभर श्री सातेरी मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. गावातील सुवासिनींसह लग्न करून बाहेरगावी गेलेल्या मुलींनी माहेरी या उत्सवाला उपस्थित राहून देवीच्या चरणी सेवा अर्पण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com